ठाणे रिंग मेट्रोबाबत ईडनवूडच्या रहिवाशांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा करण्याचे आश्वासन...

    29-Aug-2026
Thane Ring Metro 
 
ठाणे : (Thane Ring Metro) ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रोच्या प्रस्तावित मार्गाबाबत ईडनवूड परिसरातील रहिवाशांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपल्या विविध समस्या आणि आक्षेप मांडले. यावेळी रहिवाशांनी आपल्या मागण्यांचे निवेदन, विविध पत्रे तसेच १,००० हून अधिक रहिवाशांच्या स्वाक्षऱ्यांची यादी उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केली.
 
ईडनवूडसह परिसरातील काही अन्य गृहनिर्माण संकुलांतील रहिवाशांनीही आपल्या समस्या आणि मागण्यांची पत्रे यावेळी दिली. प्रस्तावित मेट्रो मार्गामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत रहिवाशांनी सविस्तर माहिती उपमुख्यमंत्र्यांना दिली. (Thane Ring Metro)
 
यावेळी एकनाथ शिंदे यांनी रहिवाशांच्या प्रश्नांची दखल घेत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याशी या समस्यांबाबत चर्चा करून त्याकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले. प्रस्तावित मार्गात बदल किंवा पुनर्मार्गीकरण तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्यासच त्याबाबत विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Thane Ring Metro)
 
रिंग मेट्रो प्रकल्प हा जनतेच्या हितासाठीच राबविण्यात येत असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे रहिवाशांनी मांडलेल्या प्रश्नांवर महामेट्रोकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे आता ईडनवूड परिसरातील रहिवाशांचे लक्ष लागले आहे. (Thane Ring Metro)
 
 




संबंधित मजकूर