मुंबई : (Bilaspur Violence) छत्तीसगडच्या बिलासपूर शहरातील खपरगंज भागात शुक्रवारी रात्री रक्षाबंधन करून परतणाऱ्या हिंदू तरुणांवर धर्मांध मुस्लिमांना हल्ला केल्याचे निदर्शनास आले आहे. बिलासपूरच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खपरगंज आणि मसानगंज परिसरात दोन समुदायांमध्ये सुरू झालेल्या शाब्दिक वादाचे रुपांतर काही क्षणांतच भीषण दगडफेकीत झाले.
स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शुक्रवारी रात्री काही हिंदू तरुण आपल्या बहिणींकडून रक्षाबंधन करून परतत होते. तेव्हा खपरगंज परिसरात काही धर्मांध मुस्लिमांनी त्यांना अडवले आणि पर्यायी मार्गाने जाण्यास सांगितले. तेव्हा झालेल्या शाब्दीक वादाचे रुपांतर मारहाणीत झाले आणि कालांतराने ते हिंसक वळणावर गेले. धर्मांध मुस्लिमांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. हिंसक जमावाने घरांवर, दुकानांवर आणि थेट सिटी कोतवाली पोलीस ठाण्यावर विटा व दगडांचा वर्षाव केला. या दगडफेकीमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.(Bilaspur Violence)
अशी माहिती आहे की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही जमावाने दगडफेक केली. या हल्ल्यात तारबहार पोलिस ठाण्याचे प्रभारी रवी तिवारी यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी आणि नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाढता तणाव पाहता पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार करत अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला.(Bilaspur Violence)
घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने शेजारच्या मुंगेली आणि जांजगीर जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलिस दल पाचारण केले. जिल्हाधिकारी संजय अग्रवाल आणि एसएसपी रजनेश सिंह यांनी रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात थांबून परिस्थितीचा आढावा घेतला आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. सध्या संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असून संवेदनशील भागांमध्ये सतत गस्त घातली जात आहे. हिंसाचार, दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ क्लिप्सचा आधार घेतला जात आहे. दगडफेक करणाऱ्यांवर व सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट शेअर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.(Bilaspur Violence)
बिलासपूर हे परस्पर बंधुभाव आणि सामाजिक सौहार्दासाठी ओळखले जाते; त्यामुळे हे वातावरण बिघडवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी संजय अग्रवाल यांनी सांगितले. तसेच, नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शहरात शांतता राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.(Bilaspur Violence)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक