ज्या पिढीला घडवलं ती आता विचारत सुद्धा नाही !

सतीश पुळेकर यांनी व्यक्त केली खंत !

    28-Aug-2026
 
 
satish
 
 
 
मुंबई - (Satish Pulekar)'द्विधा' या वडील आणि मुलीच्या नातेसंबंधावर प्रकाश टाकणारा हृदयस्पर्शी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सतीश पुळेकर आणि मानसी कुळकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असून पुळेकर वेगळ्या भूमिकेत या सिनेमात दिसणार आहेत. याच निमित्ताने ज्येष्ठ अभिनेता सतीश पुळेकर यांच्याशी विविध विषयांवर गप्पा रंगल्या. या वेळी बोलताना सतीश पुळेकर यांनी ज्या पिढीला घडवलं ती आता विचारत सुद्धा नाही, अशी खंत व्यक्त केली.
 
 
'मुंबई तरुण भारत'शी संवाद साधताना सतीश पुळेकर म्हणाले कि. आता माझं वय 76 असून ह्या वयातही निर्मात्यांना मी आठवतो यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. मी आधी खूप चित्रपट केलेत अशातला भाग नाहीये. माझा स्वभाव शिस्तबद्ध आहे, काही कडक वैगैरे नाही. मला शिस्तबद्ध माणसं प्रचंड आवडतात. पण माझ्या या स्वभावाचा अपप्रचार केल्यामुळे मला कमी कामं मिळाली. एक अक्खी पिढी माझ्या हाताखाली तयार झाली. मी त्यांच्यावर रागवायचो, चिडायचो एवढंच त्यांनी डोक्यात ठेवलं. पण त्यामागची भावना त्यांनी समजून घेतली नाही. आज त्यांच्यापैकी कोणीच मला विचारत नाही याच वाईट वाटतं. दुसरी एक गोष्ट, कोणाला समजा मी नट म्हणून हवो असेल आणि त्यांनी कुणाला माझा नंबर मागितला तर 'सतीशला घेताय, मस्त..मस्त. पण बघा हं,' असं उत्तर त्यांना मिळायचं. 'बघा हं' म्हंटल म्हणजे सिनेमा हातातून गेला. मी असं खूप भोगलंय. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे दोनच हिरो मी तरुण असताना होते. त्यावेळेला त्यांनी सोडलेले चित्रपट माझ्या वाट्याला यायचे, अशी त्यांनी यावेळी सांगितलं.(Satish Pulekar)
 




संबंधित मजकूर