परळच्या लक्ष्मी कॉटेज परिसरातील धर्मांधांचा उन्माद पूर्वनियोजित कट! विहिंपच्या राजीव चौबे यांचा धक्कादायक खुलासा

    28-Aug-2026   
 
 Parel Lakshmi Cottage Eid Violence
 
मुंबई (Parel Lakshmi Cottage Eid Violence) : परळ-चिंचपोकळी परिसरात बुधवार, दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री ईदच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत तुफान राडा झाला. परळच्या लक्ष्मी कॉटेज परिसरातून ईद साजरी करून परतणाऱ्या काही उन्मादी धर्मांधांनी हिंदुबहुल भागात घुसून जाणीवपूर्वक जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरातील वातावरण क्षणार्धात चिघळले. रात्रीच्या वेळी गोंधळ घालणाऱ्या हुल्लडबाजांना जेव्हा स्थानिक हिंदूंनी शांततेत जाण्याचे आवाहन केले, तेव्हा धर्मांधांनी स्थानिक रहिवाशांशीच हुज्जत घातली. मात्र हा संपूर्ण प्रकार अचानक घडलेला नसून पूर्वनियोजित कट असल्याचा खळबळजनक दावा स्थानिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
 
विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री (मुंबई शहर) राजीव चौबे यांनी असा दावा केला की, लक्ष्मी कॉटेज परिसरात उन्माद माजवणारे धर्मांध पूर्ण तयारीनिशीच आले होते. दगड आणि काचेच्या बाटल्यांसारखी हत्यारे आधीपासूनच हातात घेऊन ते सज्ज होते. हिंदूंच्या सणाला आणि शांततेला सुरुंग लावण्यासाठीच ईदच्या रात्री हा संपूर्ण प्रकार कट रचून घडवून आणला गेला आहे, असा आरोप राजीव चौबे यांनी केलाय. (Parel Lakshmi Cottage Eid Violence)
 
पुढे ते म्हणाले, लालबाग-परळ हा संपूर्ण परिसर हिंदूंचा मानबिंदू मानला जातो. लालबागच्या राजावर केवळ मुंबई किंवा महाराष्ट्राचीच नव्हे, तर जगभरातील करोडो भाविकांची अथांग श्रद्धा आहे. अशा पवित्र आणि संवेदनशील ठिकाणी येऊन उघडपणे उन्माद माजवण्याचे धाडस होतेच कसे, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
 
सर्वात गंभीर बाब म्हणजे, अशा प्रकारची कोणतीही अप्रिय घटना घडण्याची शक्यता असल्याबाबत विश्व हिंदू परिषदेने दोन दिवसांपूर्वीच पोलिसांना दिली होती. तरीही पोलिसांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष का केले? संभाव्य धोक्यावर वेळेत गंभीर विचार का केला गेला नाही? असा सवाल राजीव चौबे यांनी केला आहे. (Parel Lakshmi Cottage Eid Violence)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर