ईदच्या मिरवणुकांमध्ये देशविरोधी विकृतीचे प्रदर्शन; कायदा-सुव्यवस्थेचे वाजवले तीन-तेरा

    28-Aug-2026   
 
Eid Processions Controversy
 
मुंबई (Eid Processions Controversy) : देशभरातील मुस्लिम समाजाने बुधवारी ईद साजरी केली. मात्र, या निमित्ताने काढण्यात आलेल्या काही मिरवणुकांमधून विविध राज्यांत वादग्रस्त घटना घडल्याचे निदर्शनास आले. काही धर्मांध आणि खोडसाळ प्रवृत्तीच्या मुस्लिमांमुळे गालबोट लागल्याचे दिसले. कर्नाटक, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि खुद्द महाराष्ट्रातही या सामाजिक शांततेला बाधा पोहोचवणाऱ्या कृत्यांमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 
कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला येथे ईदच्या मिरवणुकीदरम्यान मोहम्मद रझा अकबर अली या धर्मांधांने थेट पॅलेस्टिनी झेंडा फडकवून परिसरातील वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला. हीच विकृती पश्चिम बंगालमधील इस्लामपूर येथेही पाहायला मिळाली, जिथे उघडपणे पॅलेस्टिनी झेंडे फडकवून राष्ट्रविरोधी मानसिकतेचे प्रदर्शन करण्यात आले. (Eid Processions Controversy)
 
उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये तर कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली. मिरवणुकीच्या नावाने भररस्त्यात अल्पवयीन मुलांसह काही व्यक्तींनी धारदार मोठे सुरे आणि शस्त्रे उंचावून दहशत माजवणारा नगानाच केला. इतकेच नव्हे, तर लाऊडस्पीकरवर भडकवणारी, धमकीवजा गाणी वाजवून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे साम्राज्य निर्माण केले गेले. यासंबंधी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Eid Processions Controversy)
 
दुसरीकडे, महोबा जिल्ह्यात देशाच्या अस्मितेवरच थेट घाला घालण्याचा संतापजनक प्रकार घडला. येथील मिरवणुकीत भारतीय राष्ट्रध्वजावरील अशोकचक्र हटवून त्या जागी इस्लामिक शब्द लिहीत तिरंग्याचा अवमान करण्यात आला. या संतापजनक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
 
मुंबईतील परळ-चिंचपोकळी परिसरात लक्ष्मी कॉटेज इमारतीजवळ ईदच्या मिरवणुकीदरम्यान धर्मांधांनी प्रक्षोभक घोषणाबाजी, पोस्टर्स फाडण्याच्या वादातून दोन गटांत जोरदार वाद झाला. सुदैवाने, मुंबई पोलिसांनी वेळीच कठोर हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठी घटना टळली. सणांच्या नावाखाली उघडपणे शस्त्रप्रदर्शन करणे, परकीय झेंडे फडकवणे आणि देशाच्या राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या अशा धर्मांध प्रवृत्तींवर कडकडीत कारवाई करून त्यांना धडा शिकवण्याची जोरदार मागणी आता सर्वस्तरांतून केली जात आहे. (Eid Processions Controversy)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर