कपिल देशपांडे
मुंबई - (Toxic )कन्नड सुपरस्टार यशचा नवा सिनेमा 'टॉक्सिक' संपूर्ण जगभरात १२, 000 पेक्षा जास्त स्क्रीनवर जगभरात प्रदर्शित झालाय..भारतात या चित्रपटाला 17692 शोज मिळाले आहेत. बॉक्स ऑफीसवर सिनेमा नवे कीर्तिमान लिहिण्याच्या तयारीत आहे. पण असं असलं तरी 'टॉक्सिक'मुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी चित्रपटांची गळचेपी होत असल्याचं दिसतंय. या चित्रपटामुळे 28 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असलेल्या 'भाता' या मराठी चित्रपटाला चित्रपट गृह मिळत नसल्याचं चित्र उभं राहिलंय . 'टॉक्सिक'ने पुढचे दोन आठवडे सगळे चित्रपटगृह ब्लॉक केल्यामुळे 'भाटा'च्या निर्मात्यांवर कुणी चित्रपट गृह देता का ? असा प्रश्न विचारण्याची वेळ आलीये. 'भाटा'सोबतच 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या 'समर्थ' या चित्रपटाला चित्रपट गृह मिळवण्यासाठी प्रचंड त्रास होतोय..Toxic
तब्ब्ल 400 कोटींचं बजेट असलेल्या 'टॉक्सिक'ची गेल्या वर्षभरापासून चर्चा आहे. तब्ब्ल तीनदा या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख बदलल्यानंतर अखेरीस हा चित्रपट काल प्रदर्शित झाला.. 'के जीफ' नंतर तब्ब्ल 4 वर्षानंतर यशचा चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे चाहत्यांमध्ये या सिनेमाबद्दल प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळेच हिंदीसह इतर भाषेतील चित्रपटांनीही आपली प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. पण 'भाटा'च्या निर्मात्यांनी हा सिनेमा 28 ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. पण आता 'टॉक्सिक'मुळे 'भाटा'ला चित्रपटगृह मिळेनाशी झालीय. त्यामुळे ह्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख बदलून आता 11 सप्टेंबर रोजी 'भाटा' प्रदर्शित होणार आहे..Toxic
त्याचबरोबर समर्थ या चित्रपटाच्या निर्मात्याची पण हिच शोकांतिका आहे.
'समर्थ' हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात रिलीज झाला .दोन बॉलीवूडचे चित्रपट आवारापन 2 आणि बटवारा 1947 समोर असताना देखील त्यांच्यासमोर समीक्षकांच्या उत्तम प्रतिक्रिया, प्रेक्षकांच्या प्रेमामुळे हा चित्रपट तग धरून राहिला. चित्रपटगृहांमधून केवळ एक शो रोज देण्यात आला होता आणि आता दक्षिणेच्या आलेल्या चित्रपटामुळे बारा दिवसांमध्येच चित्रपटाच्या स्क्रीन केवळ पूर्ण महाराष्ट्रभर मिळून 25 इतक्या कमी झाल्या आहेत. प्रेक्षकांना चित्रपट बघायचा आहे,पण स्क्रिन नसल्यामुळे बघणार तरी कुठे ह्या चिंतेने निर्मात्यांना ग्रासलं आहे.. जर आपल्याच महाराष्ट्रात आपल्याच चित्रपटाना स्क्रीन मिळवण्यासाठी भांडाव लागणार असेल तर चित्रपट निर्मिती करायची कि नाही असा सवाल निर्मात्यांनी विचारला आहे..Toxic
------------------------------------------------
विद्यार्थ्यांना आम्ही सवलतीच्या दरात हा चित्रपट दाखवत आहोत. आत्तापर्यंत दहा हजार विद्यार्थी चित्रपट बघून समर्थांच्या विचारांशी परिचित झालेले आहेत. अजूनही बऱ्याच शाळा चित्रपट पाहण्याच्या प्रतीक्षेत असताना आम्हाला चित्रपटगृह मिळत नाहीयेत. दक्षिणेच्या चित्रपटाला चारशे रुपये तिकीट आहे.त्यामुळे उत्पन्नाचा विचार करता चित्रपटगृह आमचा आवाज ऐकायला तयार नाहीत. आता मराठी चित्रपटांनी दक्षिणेमध्ये जाऊन चित्रपट प्रदर्शित करायचा का? आमच्या मातीमध्येच आम्हाला न्याय मिळणार नाही का? Toxic
रविंद्र पाठक, निर्माता,समर्थ
-------
आमचा 'भाटा'सिनेमा 28 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता.. पण एक मोठा सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे आम्हाला थीएटर मिळेनाशी झालीयेत.. त्यामुळे नाईलाजास्तव आमचा सिनेमा आम्ही आता 11 सप्टेंबर रोजी प्रदर्शित करणार आहोत.. आपल्याच महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला थिएटर मिळण्यासाठी भांडाव लागतंय हि खूप मोठी शोकांतिका आहे..Toxic
विजय चव्हाण, निर्माता, भाटा