सावध ऐका पुढल्या हाका!

    27-Aug-2026
 
 Mumbai Demographic Change
 
लोकसंख्येच्या स्वरूपातील बदल (डेमोग्राफिक चेंज) हा ‘स्लो पॉयझनिंग’चा प्रकार. त्याचा परिणाम एका रात्रीत जाणवत नाही. पण, तो कायमस्वरूपी टिकणारा असतो. देशात ज्या प्रमाणात लोकसंख्येच्या स्वरूपात बदल घडत आहे, त्याचेच छोटे रूप मुंबईतही आकार घेत असल्याचे अधिवक्ता परिषदेच्या एका अभ्यासाअंती काढलेल्या निष्कर्षाने दाखवून दिले. शिवाय लोकसंख्याबदलाचे परिणाम किती धोकादायक असतात, तेही माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकण्याच्या प्रकाराने सिद्ध केले.
 
गणेशोत्सव आता जेमतेम तीन आठवड्यांवर येऊन ठेपला असून, अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आपली मूर्ती कारखान्यातून वाजतगाजत मंडपात आणण्यात गुंतली आहेत. मुंबईतील अशाच एका गणपती आगमन मिरवणुकीवर माझगाव परिसरात एका उंच इमारतीतून अंडी फेकण्यात आली. अशा घटना यापूर्वीही घडलेल्या आहेतच. पण, नजीकच्या भविष्यात असे दुर्दैवी प्रकार वाढत जाण्याची शयताच अधिक दिसते. याचे कारण म्हणजे, मुंबईच्या लोकसंख्येच्या स्वरूपात मूलगामी बदल घडत असून, मुस्लिमांची लोकसंख्या वाढत चालली असल्याचा समोर आलेला निष्कर्ष! ‘अधिवक्ता परिषदे’ने मुंबईतील लोकसंख्येच्या स्वरूपातील बदलांचा अभ्यास करुन यासंबंधीची धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे. त्यानुसार असे दिसून आले आहे की, मुंबईतील ३६ पैकी निम्म्या, म्हणजे १७ विधानसभा मतदारसंघात मुस्लीम मतदारांचे प्रमाण ३५ टक्क्यांवर गेले आहे. सात मतदारसंघांत तर ते ३० टक्क्यांवर गेले आहे. यंदा झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपेक्षा ‘एमआयएम’ पक्षाचे अधिक नगरसेवक कसे निवडून आले, त्यामागचे कारण या आकडेवारीवरुन आपसुकच स्पष्ट व्हावे.
त्यामुळे मुंबईतील लोकसंख्येत मुस्लिमांचे प्रमाण वाढत चालले आहे, ही अधिक धोकादायक घडामोड म्हणावी लागेल. यामागचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे, काँग्रेस व अन्य कथित सेक्युलर पक्षांनी आपल्या संकुचित राजकारणासाठी बांगलादेशी घुसखोरांना मुंबईत वसविले. ज्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी मतपेढीच्या राजकारणासाठी बांगलादेशी घुसखोरांना आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र वगैरे सरकारी कागदपत्रे उपलब्ध करून भारताचे मतदार बनविले, तशीच काहीशी स्थिती मुंबईतही निर्माण झाली. मुंबईत हजारो बांगलादेशी घुसखोरांच्या वस्त्या उभ्या राहिल्या. तसेच बांगलादेशातूनच नाही, तर देशाच्या कानाकोपर्‍यातून दाखल झालेल्या मुस्लिमांमुळे ही लोकसंख्या कालौघात वाढत गेल्याचे दिसते.
 
या वाढत्या लोकसंख्येचे अनेक सामाजिक व राजकीय दुष्परिणाम मुंबईच्या समाजजीवनावरही वेळोवेळी दिसून आले. मुस्लीम समाज स्वत:ची वस्ती (घेटो) तयार करून तिचा हळूहळू विस्तार करतो. एका भागात मुस्लिमांची वस्ती झाली की, तिच्यापासून आजूबाजूच्या भागांना उपद्रव सुरू होतो. त्यामुळे या वस्त्यांपासून बिगर हिंदू समाजाला अन्यत्र स्थलांतरासाठी बाध्य केले जाते. त्यांच्या जागांवर मुस्लिमांचाच ताबा होतो आणि हे चक्र व्यापक होत जाते. अशा वस्त्या दाटीवाटीच्या असतात. परिणामी, या वस्त्या अनेक बेकायदा उद्योगांचे केंद्र म्हणून देशविघातक शक्तींना बळ देतात. अगदी परराज्यातील गुंडांनाही आश्रय मिळतो. गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावते. बलात्कारापासून ते ‘लव्ह जिहाद’पर्यंत हिंदू लेकीबाळींची अब्रू धोक्यात येते. अशाच वस्त्यांमध्ये हमखास मशिदी आणि मदरसे जागा मिळेल तसे उभे केले जातात. भोंग्यांचा आवाज वाढत जातो आणि पुढे याच मशिदींचा वापर कट्टर धार्मिकतेच्या प्रसारासाठी राजरोसपणे सुरु होतो. त्याचबरोबर मुस्लीम समाजातील वाढता जन्मदर, कुटुंब नियोजनाचा अभाव, बहुपत्नीत्वाची प्रथा, ही देखील अशा वस्त्यांमधील लोकसंख्या झपाट्याने वाढण्यामागची काही प्रमुख कारणे आहेतच. या अनिर्बंध लोकसंख्यावाढीचे विपरीत परिणामही मागील काही वर्षांक दिसून आले आहेत. काही वर्षांपूर्वी मुंबईतील मालवणी परिसरातून अनेक हिंदू कुटुंबांना आपला गाशा गुंडाळून अन्यत्र जाणे भाग पाडले गेले (दिल्लीत ही गोष्ट सर्रास होताना दिसते). त्यामागे वर वर्णन केलेलाच घटनाक्रम कारणीभूत आहेच. तसेच गेल्या काही वर्षांपासून रामनवमी, हनुमान जयंती वगैरे हिंदू सणांच्या मिरवणुकांवर दगडफेकीच्या घटना घडत आहेत. तसेच होळीसारख्या सणांमध्येही उपद्रव व हिंसाचार उत्पन्न केला जातो. शहराच्या ज्या भागात मुस्लिमांची वस्ती अधिक आहे, तेथे या घटना बहुतांशी घडताना दिसतात. हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांना आक्षेप घेतला जातो आणि कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण केली जाते. तेव्हा पोलिसांकडून हिंदूंनाच संयम राखण्याचे आवाहन केले जाते. त्याला राजकीय पक्षांचे मतपेढीचे राजकारणच प्रामुख्याने कारणीभूत.
 
आता मुंबईतही अशा घटना घडू लागल्या आहेत, हा मुस्लीम लोकसंख्यावाढीचाच परिणाम. गणेशोत्सव आता जेमतेम तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. अशा वेळी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आपल्या उंच मूर्ती कारखान्यातून आपल्या मंडळाच्या मंडपात मिरवणुकीने आणत असतात. अशाच एका मिरवणुकीवर माझगाव परिसरातील एका उंच इमारतीतून अंडी फेकण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आरोपींना ताब्यात घेतल्याने संभाव्य हिंसाचार टळला असला, तरी अशा घटनांमुळे तणावाची स्थिती निर्माण होते. गणपती आगमनाच्या मिरवणुकीवर अंडी फेकण्याची घटना प्रथमच घडलेली नाही. त्यामुळे भविष्यात होणार्‍या अशुभ घटनांची ही नांदी म्हणावी लागेल. पण, मुंबईच्या भूतकाळात अशाच आणखीन काही घटना खरं तर ‘डेमोग्राफिक चेंज’ची धोक्याची घंटा वाजवून गेल्या होत्याच. परंतु, तत्कालीन काँग्रेस सरकारने त्याकडे मतपेढीच्या राजकारणातून ‘संकट’ नव्हे तर ‘संधी’ म्हणूनच बघितले. महाराष्ट्रात २०१२ साली काँग्रेसचे सरकार असताना आझाद मैदान परिसरात घडवून आणलेली दंगलही जिहादींच्या शक्तिप्रदर्शनाचाच डाव होता. मुंबईशी सोडा, भारताशीही दुरान्वयाने संबंध नसलेल्या प्रकरणावरुन तेव्हा कट्टर जिहादींनी जाळपोळ केली होती. कारण काय तर म्यानमारमधील रखिने प्रांतात मुस्लिमांवर झालेले कथित अत्याचार. त्याविरोधात मुंबईत ‘रझा अकादमी’ने मोर्चा काढला. त्यात अमरजवान ज्योतीला लाथ मारण्यापासून ते महिला पोलीस कर्मचार्‍यांचा विनयभंग करण्यापर्यंत आणि अगदी पोलिसांची, माध्यमांची वाहने पेटवण्यापर्यंत या जिहादींची मजल गेली होती. १९९३ सालीही मुंबईत बॉम्बस्फोट झाले. दंगली भडकल्या. त्यानंतर मुंबईच्या लोकलमधील साखळी स्फोट असतील, २६/११चा नापाक दहशतवादी हल्ला असेल, या प्रकरणांनीही वेळोवेळी ‘डेमोग्राफिक चेंज’चा धोका अधोरेखित केलाच. कारण, दहशतवाद्यांच्या ‘स्लिपर सेल्स’साठी काम करणारे याच मातीत वाढलेले, याच देशात राहणारे आणि इथेच खाणारे होते, हे सत्य कदापि नजरेआड करता येणार नाही.
 
तेव्हा, या सगळ्यावर उपाय म्हणजे, सरकारी नियंत्रणे अधिक कडक करणे होय. बेकायदा आणि अनधिकृत बांधकामांवर, वस्त्यांवर कठोर कारवाई करणे, ‘एसआयआर’सारख्या मोहिमा राबविणे अत्यावश्यकच. शिवाय लोकसंख्या नियंत्रण, बहुपत्नीत्वावर बंदीचा कायदा आणि समान नागरी कायदा ही आता काळाची गरज म्हणावी लागेल. देशात ‘डेमोग्राफी’ आयोग स्थापन करण्याचा निर्णयदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. पण, याकडे केवळ सरकारची अथवा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची नैतिक जबाबदारी म्हणून न पाहता, हिंदू म्हणून आपणही तितकेच सावध, सजग आणि सतर्क राहणे आवश्यक असेच!
 
 




संबंधित मजकूर