मुंबई : (Modi Express) गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ सज्ज झाली आहे. सलग १४व्या वर्षी गणेशभक्तांना मुंबईहून थेट कोकणात पोहोचविण्यासाठी ही विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. (Modi Express)
यंदा दि. ९ आणि दि.११ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहे. मुंबईहून सुटल्यानंतर या रेल्वेला रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली आणि सावंतवाडी येथे थांबे असतील. (Modi Express)
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबईहून कोकणात जातात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर व्हावा, यासाठी ‘मोदी एक्सप्रेस’मध्ये पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ आणि प्रवासादरम्यान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. (Modi Express)
२ ते ५ सप्टेंबरदरम्यान बुकिंग
‘मोदी एक्सप्रेस’साठी तिकीट बुकिंग दि. २ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर या कालावधीत करता येणार आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडी परिसरातील प्रवाशांनी संबंधित भाजप मंडळ अध्यक्षांशी, तर रत्नागिरीतील प्रवाशांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Modi Express)
गेल्या १४ वर्षांपासून गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील चाकरमान्यांना त्यांच्या गावी पोहोचविणाऱ्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांना पुन्हा एकदा आपल्या मातीशी जोडणारी ‘मोदी एक्सप्रेस’ची सेवा सुरू होत असल्याने चाकरमान्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (Modi Express)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.