मुंबई - (Marathi Natak )सृजन प्रेक्षकांना वेळेअभावी सर्वच नाटके, सांस्कृतिक कार्यक्रम पाहाता येतात असे नाही परंतु नेहरू सेंटर मात्र प्रत्येक वर्षी विविध कलाविष्कारांचे दर्शन घडवते तेही विनामूल्य. सुसज्ज नाट्यगृह म्हटल्यानंतर प्रेक्षक अशा महोत्सवाचे सातत्याने प्रतिक्षा करीत असतात. प्रत्येक महिन्याला प्रेषकांचे लक्ष वेधले जाईल अशा महोत्सवाचे आयोजन केले जाते.
सप्टेंबर महिना हा बहुभाषिक नाट्य महोत्सवासाठी राखीव असतो. ज्या गोष्टीला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो. त्या महोत्सवाने आज दोन दशकाचा टप्पा हा गाठलेला आहे. नेहरू सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात येणारा बहुभाषिक 'थेएटरट फेस्टिवल' हा महोत्सव त्यापैकी एक सांगता येईल. या वेळेला ७ ते ११ सप्टेंबर २०२६ या यादरम्यान रोज सायंकाळी ७ वाजता मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी, कोंकणी नाटकांचा आनंद घेता येईल. सर्वोत्तम ठरलेल्या, लोकप्रतिक्षेत असलेल्या नाटकांचा महोत्सव येथे होणार आहे.महोत्सवाची सुरुवात ही यावर्षी राज्य नाट्य व्यावसायिक मराठी स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त ठरलेले. 'भूमिका' हे नाटक होणार आहे. क्षितिज पटवर्धन लिखित या नाटकाचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलेले आहे. (Marathi Natak )
'जीगीषा' आणि 'अष्टविनायक' या संस्थेच्या वतीने दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर यांनी या नाटकाची निर्मिती केलेली आहे. हिंदी, मराठी अन्य भाषीक चित्रपटांमध्ये मानाचे स्थान निर्माण करून असलेले सचिन खेडेकर यांची यात मध्यवर्ती भूमिका आहे. याशिवाय या नाटकात समिधा गुरु, अतुल महाजन, सुयश झुंजूरके, जयश्री जगताप, जाई खांडेकर यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. (Marathi Natak )
दुसऱ्या दिवशी लीला आर्ट्स, गौतम जोशी आणि सर्जन चित्रक शाह, किरण मालवणकर प्रस्तुत 'जिवतो रहेजे जान्यूआरी सुधी' हे गुजराती नाटक सादर होणार आहे. जितेंद्र जोशी, क्रीष्णा शाह, कविर सरवैया, डॉ. उदय मोदी यांनी या नाटकाची निर्मिती केलेली आहे. या नाटकात हिंदी, मराठी बरोबर गुजराती नाटकात हमखास दिसणारा अभिनेता संदीप मेहता यांच्यासोबत सौनील दरू, किंजल भट्ट यांच्या यात भूमिका आहेत. कृपा मिश्रा, जनमेजय तेलंग, धनवीर सोनी यांचा सहकलाकार म्हणून सहभाग आहे. विनोद सरवैया यांनी या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन शिवाय संगीताची बाजू सांभाळलेली आहे. छान मनोरंजन करणारी ही कलाकृती विनोदी ढंगात सादर करण्यात येणार आहे.
(Marathi Natak )
९ सप्टेंबर रोजी गोवा पणजीची 'अभिव्यक्ती' ही संस्था 'अज्ञातकथा' ही हिंदी, कोंकणी भाषेतली कलाकृती रंगमंचावर सादर होणार आहेत. अंतरा भिडे यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. साईश देशपांडे यांनी केलेले आहे. नेपथ्य, संगीताची बाजू सुद्धा त्यांनी सांभाळलेली आहे. लोक महाभारतची कथा वेगळ्या पद्धतीने यात सादर केली जाणार आहे. प्रियंका वेरेकर, अभिषेक धावसकर, तानिया गायकवाड, अक्षय भातुल्ये यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 'द लॉस्ट सपर' हे इंग्रजी नाटक १० सप्टेंबररोजी होणार आहे. अभिनेते सुनील बर्वे यांच्या 'सुबक' संस्थेची ही निर्मिती असून आव्हाहन, आयपीएच यांचा सुद्धा निर्मितीत सहभाग आहे. डॉ. आनंद नाडकर्णी या नाटकाचे लेखक आहेत तर दिग्दर्शनाची बाजू प्रतिमा कुलकर्णी यांनी सांभाळलेली आहे. स्वामी विवेकानंद आणि शिष्या भगिनी निवेदिता यांच्यातला अखेरचा संवाद या नाटकात अधोरेखित केलेला आहे. गिरीश परदेशी, डॉ. प्रज्ञा मानवरकर यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे.(Marathi Natak )
महोत्सवाची सांगता ही ११ सप्टेंबर रोजी होणार आहे.ओंकार गोखले लिखित आणि सुरज परसनिस दिग्दर्शित मराठी नाटक 'ही दोस्ती तुटायची नाय' या नाटकाने होणार आहे. 'नाट्यलीला थिएटर्स' आणि 'अष्टविनायक' यांच्यावतीने दिलीप जाधव, सुमीत राघवन यांनी या नाटकाची निर्मिती केलेली आहे. या नाटकात स्वतः सुमीत राघवन आणि त्यांच्याबरोबर अभिनेत्री चिन्मय सुमीत हे प्रमुख भूमिकेत आहेत. जनमानसात तुफान लोकप्रियता मिळून असलेली ही जोडी पुन्हा रंगमंचावर या निमित्ताने एकत्र आलेली आहेत. याशिवाय अमृता बने, शुभंकर एकबोटे यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे. निरद सुमीत यांच्या संगीताने नटलेल्या या नाटकाचे नेपथ्य नीरज शिरवईकर यांनी केले आहे.(Marathi Natak )