महाराष्ट्राच्या ब्ल्यू इकोनॉमीचा जर्मनीत वाजणार डंका; बंदरे, जहाजबांधणी अन् ब्ल्यू इकॉनॉमीवर भर - वाचा सविस्तर

Maharashtra Blue Economy
 
मुंबई :(Maharashtra Blue Economy) जगातील आघाडीच्या सागरी व्यापार प्रदर्शनांपैकी एक असलेल्या एसएमएम हॅम्बर्ग २०२६ मध्ये महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्राचा ठसा उमटणार आहे. जर्मनीतील हॅम्बर्ग येथे होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय सागरी प्रदर्शनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड सज्ज झाले आहे. या सहभागातून महाराष्ट्राच्या बंदरे, जहाजबांधणी, सागरी उद्योग आणि ब्ल्यू इकॉनॉमीच्या संधी जगाच्या व्यासपीठावर मांडल्या जाणार आहेत.
 
एसएमएम हॅम्बर्गमध्ये जगभरातील जहाजबांधणी कंपन्या, बंदर विकास संस्था, सागरी तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, नौदल प्रतिनिधी आणि सरकारी संस्था एकत्र येतात. यंदाच्या वर्षी दि. 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर दरम्यान जर्मनीतील हॅम्बर्ग येथे होणार आहे. एसएमएम हॅम्बर्गमध्ये भारत प्रथमच अधिकृत राष्ट्रीय प्रतिनिधित्वासह सहभागी होत आहेत. त्यामुळे भारताच्या सागरी क्षेत्रासाठी तसेच महाराष्ट्रासाठी हे प्रदर्शन विशेष महत्त्वाचे ठरणार आहे.(Maharashtra Blue Economy)
 
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सागरी क्षमतेचे सादरीकरण करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा या परिषदेतील सहभाग महत्त्वपूर्ण मानला जात आहे. बंदर विकास, जहाजबांधणी, सागरी लॉजिस्टिक्स, डिजिटल तंत्रज्ञान, हरित सागरी वाहतूक आणि ब्ल्यू इकॉनॉमी या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याची संधी या सहभागामुळे आणि दौऱ्यामुळे उपलब्ध होणार आहे.(Maharashtra Blue Economy)
 
भारताची ताकदही जगासमोर
 
एसएमएम २०२६ मध्ये प्रथमच केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय (MoPSW) आणि इंडियन पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून दोन अधिकृत भारतीय संयुक्त पॅव्हिलियन उभारण्यात येणार आहेत. यापैकी एक हॉल बी३.ओजीमध्ये तर दुसरा नेव्हल हॉल बी8 मध्ये असेल. याचसोबत बी३ हॉलमध्ये महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे पॅव्हिलियनदेखील असेल.(Maharashtra Blue Economy)
 
भारताकडून यंदा सुमारे ३५ प्रदर्शक सहभागी होण्याची अपेक्षा असून, चोगुले अँड कंपनी, बॉयन्सी कन्सल्टंट्स अँड इंजिनिअरिंग, स्वान डिफेन्स अँड हेवी इंडस्ट्रीज, वेदम डिझाईन अँड टेक्निकल कन्सल्टन्सी, मरीन इलेक्ट्रिकल्स इंडिया आणि सर्जी शिपबिल्डर्स एन डॉक वर्क्स यांसारख्या कंपन्यांचा सहभाग राहणार आहे.(Maharashtra Blue Economy)
 
बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालयाचे सचिव विजय कुमार या कार्यक्रमाच्या उद्घाटन परिषदेत ‘India Perspective: Global Maritime Growth & Connectivity’ या विषयावर भारताची भूमिका मांडणार आहेत. ‘The India Opportunity’ सत्रात भारतीय जहाजबांधणी, सागरी क्लस्टर्स व गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा होणार आहे. उच्चस्तरीय भारतीय नौदल व सरकारी शिष्टमंडळासह इंडियन पोर्ट्स असोसिएशन, कोचीन शिपयार्ड आणि जीआरएसइ आपली क्षमता प्रदर्शित करणार आहेत. तसेच ‘ऑल अबाऊट पोर्ट्स’मध्ये भारतीय बंदरांना तंत्रज्ञान-सक्षम व शाश्वत लॉजिस्टिक्स हब बनविण्याच्या संधींवर भर दिला जाणार आहे.(Maharashtra Blue Economy)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर