मोमोज खाल्ल्यामुळे कुर्ला परिसरातील १६ जणांना फूड पॉइझनिंगचा त्रास - वाचा सविस्तर

    27-Aug-2026
Kurla Food Poisoning
 
मुंबई : (Kurla Food Poisoning) कुर्ला पश्चिम सुंदरबाग परिसरात मोमोज खाल्ल्यामुळे १६ जणांना फूड पॉइझनिंगचा त्रास झाल्याचे समोर आले आहे. या सर्वांना उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी तसेच चक्कर येण्यासारखा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी कुर्ला येथील भाभा रुग्णालयात आणण्यात आले.
 
एकूण १६ जणांपैकी १४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, २ जणांवर ओपीडीच्या माध्यमातून उपचार करण्यात आले आहेत.(Kurla Food Poisoning)
 
संपूर्ण घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी भाभा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांच्या प्रकृतीची तसेच सुरू असलेल्या उपचारांची संपूर्ण माहिती घेतली.(Kurla Food Poisoning)
 
रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची नावे :
 
१. कन्नू पाशा – ३ वर्षे, महिला – बालरोग विभाग
२. अमिना पाशा – ८ वर्षे, महिला – बालरोग विभाग
३. सुफियान पाशा – ७ वर्षे, पुरुष – बालरोग विभाग
४. मिधत पाशा – १० वर्षे, महिला – बालरोग विभाग
५. रिझमा पाशा – १३ वर्षे, महिला – FMWD
६. शकीर अली – ३१ वर्षे, पुरुष – MMWD
७. सबिरा बानो – २६ वर्षे, महिला – FMWD
८. कौसर शेख – १५ वर्षे, महिला – FMWD
९. मुस्कान शेख – २४ वर्षे, महिला – FMWD
१०. प्रीती विश्वकर्मा – २२ वर्षे, महिला – FMWD
११. रोशनी विश्वकर्मा – १८ वर्षे, महिला – FMWD
१२. नसरीन आलम शेख – १९ वर्षे, महिला – FMWD
१३. अबान इरफान खान – १४ वर्षे, पुरुष – MMWD
१४. इरफान खान – ४० वर्षे, पुरुष – MMWD
 
ओपीडीच्या माध्यमातून उपचार करण्यात आलेले रुग्ण :
 
१५. शुबी खान – १४ वर्षे, महिला
१६. शाफिया खान – १३ वर्षे, महिला
 
या रुग्णांमध्ये उलट्या आणि जुलाब, तसेच काही रुग्णांमध्ये ताप, पोटदुखी आणि चक्कर येण्याची लक्षणे आढळून आली आहेत. रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या प्रकृतीनुसार आवश्यक उपचार करण्यात आले आहेत. गरजेनुसार नियमित तपासण्यांचा सल्ला देण्यात आला आहे.(Kurla Food Poisoning)
 
सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली आवश्यक उपचार सुरू आहेत.(Kurla Food Poisoning)
 
या घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी रुग्णालय प्रशासनाकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली असून, संबंधित प्रकरणाची आवश्यक ती तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.(Kurla Food Poisoning)
 
 




संबंधित मजकूर