मुंबई - (A R Raheman )राष्ट्रीय पुरस्कार विजेते शेखर कपूर त्यांच्या आयकॉनिक चित्रपट मासूमकडे “मासूम: द नेक्स्ट जनरेशन” कडे सगळ्यांच लक्ष असताना या चित्रपटांबद्दल अजून एक नवी गोष्ट समोर आली आहे. 43 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या मूळ चित्रपटाला भारतीय सिनेमात विशेष स्थान आहे आणि आजही तो कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो. बहुप्रतीक्षित या चित्रपटाबाबत अपडेट म्हणजे अकादमी पुरस्कार विजेते ए. आर. रहमान यांनी या चित्रपटातील गाण्यासाठी काम करायला सुरुवात केली असल्याच कळतय.
ए आर रहमान या चित्रपटासाठी संगीत रचणार असून त्यांनी लॉस एंजेलिसमध्ये आधीच तीन गाणी रेकॉर्ड केली आहेत. ते शेखर कपूर यांच्यासोबत या चित्रपटाचे सहनिर्माते देखील आहेत.(A R Raheman)
शेखर आणि रहमान यांची साथ 2002 पासून आहे जेव्हा त्यांनी लंडनमध्ये बॉम्बे ड्रीम्स या बॉलिवूड शैलीतील म्युझिकलसाठी एकत्र काम केले. शेखर यांनी अँड्र्यू लॉयड वेबर यांना बॉलिवूड संगीताची ओळख करून दिल्यानंतर या म्युझिकलची निर्मिती झाली आणि अखेरीस रहमान यांनाही या निर्मितीत सहभागी करून घेण्यात आले. (A R Raheman)
मासूम: द नेक्स्ट जनरेशन हा शेखर कपूर यांच्या आयकॉनिक ड्रामाचा नवा आविष्कार आहे. मूळ चित्रपटाप्रमाणेच, हा चित्रपट बदलती कौटुंबिक समीकरणे, ओळख आणि पिढ्यानपिढ्यांमधील नातेसंबंध यांचा वेध घेणार आहे. (A R Raheman)