मुंबई : (Navi Mumbai International Airport) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई मालवाहतूक सेवेच्या विस्तारात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. नॅशनल एअरलाइन्सचे बोईंग ७४७-४०० एफ मालवाहू विमान जर्मनीतील फ्रँकफर्ट-हॅन या प्रमुख युरोपीय मालवाहतूक केंद्रावरून नवी मुंबई विमानतळावर दाखल झाले. नवी मुंबई विमानतळावर दाखल झालेले हे पहिले बोईंग ७४७ मालवाहू विमान ठरले आहे.(Navi Mumbai International Airport)
नॅशनल एअरलाइन्सच्या ऐतिहासिक बोईंग ७४७ मालवाहू विमानाचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जलतोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले. मालवाहतूक घेऊन आलेल्या या दिग्गज विमानाच्या आगमनामुळे नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सेवेला आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठता आला. नॅशनल एअरलाइन्सच्या ताफ्यात सध्या नऊ बोईंग ७४७ मालवाहू विमाने आहेत. मोठ्या प्रमाणातील मालाची वाहतूक, मानवतावादी मदत आणि विशेष मालवाहतूक सेवांसाठी या विमानांचा वापर केला जातो.(Navi Mumbai International Airport)
नवी मुंबई विमानतळावरील मालवाहतूक सेवा गेल्या काही आठवड्यांत वेगाने विस्तारत आहे.
दि. १ ऑगस्ट रोजी इंडिगो कार्गोच्या एअरबस ए३२१ पी२एफ विमानाने नवी मुंबई विमानतळावरील लहान आकाराच्या मालवाहू विमानसेवेची सुरुवात केली. त्यानंतर दि.१६ ऑगस्ट रोजी हाँगकाँग एअर कार्गोने एअरबस ए३३० मालवाहू विमानाद्वारे नवी मुंबईतून मोठ्या आकाराच्या मालवाहू विमानांची सेवा सुरू केली. हाँगकाँग एअर कार्गो ही नवी मुंबई विमानतळावर समर्पित मालवाहू सेवा सुरू करणारी पहिली आंतरराष्ट्रीय विमान कंपनी ठरली.(Navi Mumbai International Airport)
हाँगकाँग आणि नवी मुंबईदरम्यान कंपनीकडून आठवड्यातून तीन मालवाहू उड्डाणे केली जात आहेत. याशिवाय अफकॉम कार्गोने ऑगस्टमध्ये नवी मुंबई विमानतळाला दुबई वर्ल्ड सेंट्रलशी जोडले आहे. त्यामुळे नवी मुंबईला आणखी एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय मालवाहतूक मार्ग मिळाला आहे. लहान आकाराच्या मालवाहू विमानांपासून एअरबस ए३३०सारख्या मोठ्या विमानांपर्यंत आणि आता बोईंग ७४७पर्यंत झालेली ही वाटचाल नवी मुंबई विमानतळाची मालवाहतूक क्षमता वेगाने वाढत असल्याचे दर्शवते.(Navi Mumbai International Airport)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.