यंदा गोपाळकाल्याऐवजी रक्षाबंधनाची सुट्टी! नेमका काय आहे बदल - वाचा सविस्तर!

    26-Aug-2026
Raksha Bandhan Holiday
 
मुंबई : (Raksha Bandhan Holiday) महानगरपालिकेतील कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी यंदाच्या स्थानिक सुट्ट्यांच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या धर्तीवर महानगरपालिकेने यंदा 'गोपाळकाला' (दहीहंडी) सणाऐवजी 'रक्षाबंधन' या सणासाठी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.(Raksha Bandhan Holiday)
 
​यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, पूर्वी शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ (गोपाळकाला) रोजी ठरवण्यात आलेली स्थानिक सुट्टी रद्द करून, त्याऐवजी शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ (रक्षाबंधन) रोजी मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील पालिकेच्या सर्व कार्यालयांना स्थानिक सुट्टी लागू राहील.(Raksha Bandhan Holiday)
 
​पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ही सुट्टी पालिकेच्या प्रशासकीय कार्यालयांना लागू असेल, तर रुग्णालये, अग्निशमन दल, पाणीपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मंजुरीने हे सुधारित परिपत्रक सोमवारी अधिकृतपणे जारी करण्यात आले.(Raksha Bandhan Holiday)
 
 




संबंधित मजकूर