बीजिंगमध्ये भारत-चीन सुरक्षा प्रमुखांची थेट चर्चा

’एलएसी’वर स्थैर्य राखण्यासाठी मॅरेथॉन बैठक ब्रिक्स शिखर परिषदेपूर्वी अजित डोवाल आणि वांग यी यांच्यात २५ व्या फेरीची चर्चा सुरू

    26-Aug-2026   
Indo-China Relations
 
बीजिंग : (Indo-China Relations) पूर्व लडाखमधील संघर्षानंतर भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये निर्माण झालेली दरी सांधण्यासाठी राजनैतिक पातळीवर मोठे प्रयत्न सुरू झाले आहेत. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात आज, २५ ऑगस्ट २०२६ रोजी बीजिंग येथे विशेष प्रतिनिधी स्तरावरील २५ व्या फेरीची सीमा सुरक्षा चर्चा झाली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करणे आणि दोन्ही देशांमधील धोरणात्मक अविश्वास कमी करणे, हा या उच्चस्तरीय बैठकीचा मुख्य अजेंडा आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या अधिकृत निमंत्रणावरून अजित डोवाल हे दोन दिवसांच्या चीन दौर्‍यावर २४ ऑगस्ट रोजी बीजिंगमध्ये दाखल झाले. आज झालेल्या मुख्य बैठकीत प्रदीर्घ सीमावादावर सखोल चर्चा करण्यात आली. (Indo-China Relations)
 
’ब्रिक्स’ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पायाभरणीपुढील महिन्यात, १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीत १८ वी ’ब्रिक्स’ (इठखउड) शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग तब्बल ७ वर्षांनंतर भारताचा अधिकृत दौरा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिनपिंग यांच्या या संभाव्य दौर्‍यापूर्वी सीमेवरील तणाव निवळणे आणि नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व शी जिनपिंग यांच्यात होऊ घातलेल्या द्विपक्षीय भेटीची रूपरेषा निश्चित करणे, हा अजित डोवाल यांच्या बीजिंग दौर्‍यामागील धोरणात्मक उद्देश आहे.सुमारे ३,४८८ किलोमीटर लांबीच्या भारत-चीन वादग्रस्त सीमाप्रश्नावर या बैठकीत दोन्ही बाजूंकडून स्वतंत्र दृष्टिकोन मांडण्यात आले. (Indo-China Relations)
 
 चीनने काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये सीमा निश्चितीसाठी ’अर्ली हार्वेस्ट’ (एरअ‍ॅश्रू करर्अ‍ॅींशीीं) करार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, संपूर्ण सीमाभागात एकाच वेळी शांतता आणि लष्कराचे पूर्ण माघारीकरण व्हावे, या आपल्या मूळ भूमिकेवर भारत ठाम आहे. त्यातच, अरुणाचल प्रदेश सीमेवर चिनी सैन्याच्या हालचालींविषयी समोर आलेल्या ताज्या अहवालांमुळे भारताने सुरक्षा आणि सीमा व्यवस्थापनाच्या मुद्यावर कमालीची कडक भूमिका घेतली आहे. (Indo-China Relations)
 
राजनैतिक संबंध सुधारण्यावर भर
 
गेल्या काही महिन्यांत दोन्ही देशांनी संबंध पूर्वपदावर आणण्यासाठी व्यावसायिक आणि राजनैतिक पातळीवर पावले टाकली आहेत. यामध्ये दोन्ही देशांमधील थेट विमानसेवा पुन्हा सुरू करणे आणि पवित्र कैलास मानसरोवर यात्रा पूर्ववत सुरू करण्यासारख्या महत्त्वाच्या लोक-कल्याणकारी विषयांवर सकारात्मक चर्चा  
 
झाली. लिपुलेख, शिपकी ला आणि नथुला या तीन प्रमुख व्यापारी मार्गांवरून सीमापार व्यापार आणि गुंतवणुकीचा प्रवाह सुरक्षित कसा ठेवता येईल, यावरही दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये सहमती झाल्याचे समजते. (Indo-China Relations)
 
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर