आदिवासी वसतीगृहातील वयाची अट रद्द! आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची घोषणा

    25-Aug-2026   
  
मुंबई: (Tribal Hostel Age Limit) आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय वसतीगृहात प्रवेश घेताना वयाची अट रद्द करण्यात आल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली.
 
नोकरभरती, गडचिरोलीतील मृत मुलींच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटींची मदत यासह विविध मागण्यांसाठी गेल्या १० दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सर्वपक्षीय आदिवासी आमदार, खासदार यांची बैठक पार पडली. (Tribal Hostel Age Limit)
 
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री अशोक उईके म्हणाले की, "आज महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आदिवासी आमदार, खासदार यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. दि. १४ ऑगस्ट २०२६ च्या शासन निर्णयात आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय वसतीगृहात प्रवेशाकरिता असलेली वयाची अट ३० करण्यात आली होती. मात्र, आता सर्व आमदार आणि खासदार यांच्या सूचनेनुसार, ही अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात वसतीगृहातील प्रवेशासाठी कोणतीही वयाची अट राहणार नाही." (Tribal Hostel Age Limit)
 
राहुल गांधींची माहिती अपूर्ण
 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. यावर बोलताना मंत्री अशोक उईके म्हणाले की, "राहुल गांधी यांना अद्ययावत माहिती देण्यात आलेली नाही. गडचिरोली येथे एका आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन मुलींचा मृत्यू झाला. ती आश्रमशाळा कुणाची आहे? ही आश्रमशाळा १०० टक्के अनुदानावर आहे. (Tribal Hostel Age Limit)
 
१९९२ ला मिळालेली ही अनुदानित आश्रमशाळा त्यांच्याच माजी मंत्र्यांची आहे, याबाबत राहुल गांधी यांना माहिती दिली असती तर, प्रश्न उपस्थित झाला नसता. राहुल गांधी यांची माहिती अपूर्ण असल्याने ते असे बोलले असतील. संपूर्ण महाराष्ट्रात १०० टक्के अनुदानित आश्रमशाळा कुणाच्या आहेत? त्या कोण चालवतात? कशा चालवतात? तिथे काय सुविधा आहे किंवा नाही? याकडे लक्ष दिल्यास सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील." (Tribal Hostel Age Limit)
 
दरम्यान, जोपर्यंत सगळ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, असल्याचे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. (Tribal Hostel Age Limit)
 

 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर