...अन सिद्धार्थ जाधव भडकला !

    25-Aug-2026
 
 
siddharth
 
 
 
 
मुंबई - (Siddharth Jadhav)मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाने वेगळी छाप पडणारा अष्टपैलू अभिनेता सिद्धार्थ जाधव एका गोष्टीमुळे चांगलाच भडकला आहे. सिद्धार्थ स्वतःच्याच मृत्यूची बातमी वाचून चांगलाच संतापला आहे. सिद्धार्थने सोशल मीडियावर एक व्हिडीओ टाकून खोटी बातमी देणाऱ्यांना खडे बोल सुनावलेत.
 
सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक बातमी दिसतेय. ज्यामध्ये , ‘ अभिनेते सिद्धार्थ जाधव यांची मृत्यूशी झुंज… गंभीर आजार…’ अशा आशयाचा मजकूर दिसतोय. स्वतःच्याच मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर अभिनेत्याने संताप व्यक्त करत एक व्हिडीओ शेअर केला आहे.  (Siddharth Jadhav)
 
सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये अभिनेता सिद्धार्थ म्हणाला, ‘नमस्कार मी ठणठणीत बरा आहे…व्यवस्थित ॲनिमलचे प्रयोग…धिंगाणाचं शूट सुरु आहे.. ज्या ज्या लोकांनी काळजीने msg /call केलेत..त्यांना मनापासून धन्यवाद… बातमीदार जरा मलातरी विचारा.. एवढी कसली घाई आहे तुम्हाला.??? ज्याने Headline /coverage बनवलाय..त्याला तर Nobel द्याच.. Man is a more dangerous Animal than an “ऍनिमल”!
त्यांचं जाऊदे.. निदान माझ्या नाटकाचं तरी promotion करतो.. न्युज वाले या माझ्या नाटकाला… 26 ऑगस्ट 8 वा. छत्रपती शिवाजीमंदिर दादर ला…! (Siddharth Jadhav)
 
सध्या सिद्धार्थच्या ह्या पोस्टची सर्वत्र चर्चा असून अनेक कलाकारांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Siddharth Jadhav)
 




संबंधित मजकूर