नवी मुंबई : (Panvel Gold Embezzlement Case) पनवेल शहरातील स्वरूप रिफायनरी ज्वेलर्स शॉपमधून तब्बल ६६ लाख ६२ हजार ३०० रुपये किमतीच्या ६६६.२३ ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या लगडींचा अपहार केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीकडून अपहार केलेल्या सहाही सोन्याच्या लगडी हस्तगत केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट २०२५ रोजी स्वरूप रिफायनरी ज्वेलर्समधील कामगार शुभम मनाजी खिलारे याच्याकडे सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ६६६.२३ ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या लगडी देण्यात आल्या होत्या. मात्र, आरोपीने या सोन्याचा अप्रामाणिकपणे अपहार केल्याची तक्रार करण्यात आली. याप्रकरणी २१ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(४) अन्वये पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Panvel Gold Embezzlement Case)
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी विविध पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी पनवेल शहर तसेच रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्याचबरोबर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्यात आला. (Panvel Gold Embezzlement Case)
तपासादरम्यान आरोपी कुरुडवाडी, सोलापूर येथे रेल्वेतून उतरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढत खिलारवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे जाऊन शुभम मनाजी खिलारे याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याच्याकडून गुन्ह्यातील ६६६.२३ ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या लगडी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. (Panvel Gold Embezzlement Case)
ही कारवाई पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, परिमंडळ-३, पनवेल आणि सहायक पोलीस आयुक्त मधुर भुजबल, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाकिर पटेल, पोलीस निरीक्षक (प्रशासन) अभिजीत अभंग यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही कामगिरी केली. (Panvel Gold Embezzlement Case)
या कारवाईत सपोनि अभिजीत पाटील, पोउपनि हजरत पठाण, पोउपनि किरण राऊत, पोहवा अविनाश गंथडे, योगेश दिवेकर, अमोल पाटील, संदेश म्हात्रे, पोना मिथुन भोसले, पोशि किरण कराड, पोना सोमनाथ म्हात्रे आणि पोशि शशिकांत काकड यांचा सहभाग होता. (Panvel Gold Embezzlement Case)