
मुंबई : (Kriti Sanon)एका ज्वेलरी ब्रॅण्ड्सच्या जाहिरातीतील कपड्यांमुळे क्रिती सेननवर चोहोबाजूनी टीकेची झोड उठली असून भाजप खासदार कंगना रणौतनेही समाचार घेतला आहे. 'स्त्रियांकडे अनेक कपड्यांचे पर्याय उपलब्ध असताना रक्षाबंधन हे बिकनी आणि अंडरगार्मेंट्सवर रक्षाबंधन का?', असा सवाल उपस्थित केला आहे. कंगनाच्या प्रश्नावर क्रितीने उत्तर दिल्याने आता वादंग उफाळून आला आहे. केवळ हिंदू सणांच्या वेळेसच असे स्टंट का केले जात आहेत, असा सवालही विचारला जाऊ लागला आहे.
कंगना म्हणाली, "हा काळ महिलांसाठी सर्वोत्तम असा असून त्यांच्या पोषाखासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. कॉकटेल ड्रेसेस, लेहंगा चोली, जीन्स ते साडी, बिकनीज ते सलवार कमीज. इतकं सगळे असूनही तुम्ही भावाला राखी बांधताना काय कपडे निवडता, तर बिकनी आणि अंडरगार्मेंट्स? तुमचे स्टायलिंग ऑप्शन्स किती आहेत? ही जाहिरातच धक्कादायक आहे." (Kriti Sanon)
क्रिती सेननने एका ज्वेलरी ब्रॅण्डची जाहिरात करताना घातलेल्या कपड्यांमुळे सध्या सोशल मीडियावर वादंग सुरू झाला. याला क्रितीनेही उत्तर दिले आहे. ती म्हणाली, "महिलांनी काय घालावे हे सांगणे आपण कधी थांबवणार?" आपले विचार स्पष्ट करताना क्रिती सॅनॉनने लिहिले की, सणांचे खरे सार तुम्ही परिधान केलेल्या कपड्यांमध्ये नसून, त्या परंपरांप्रति तुमच्या मनात असलेल्या भावना आणि अर्थामध्ये आहे. (Kriti Sanon)
रक्षाबंधनाचे महत्त्व स्पष्ट करताना तिने पुढे लिहिले, "रक्षाबंधन हे संरक्षणाचे एक अतूट बंधन आहे. मी आणि माझी बहीण एकमेकींना राखी बांधतो. आम्हाला माहित आहे की आम्ही कोणत्याही भावापेक्षा कमी एकमेकांचे रक्षण करू शकत नाही. आम्ही एकमेकांच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. (Kriti Sanon)