भिवंडीजवळील दिंडी गडावर तणाव; महादेवाच्या पवित्र स्थानी श्रावणात मांस नेण्याचा धर्मांधांचा प्रयत्न रोखला

    25-Aug-2026
Bhiwandi News 
 
ठाणे : (Bhiwandi Dindigad Clash) श्रावण महिन्यात हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेचे महत्त्व असलेल्या भिवंडीजवळील दिंडी गडावर जिहादी मुस्लिमांच्या टोळक्या कडून मांस घेऊन जाण्याच्या प्रकारामुळे मोठा वाद निर्माण झाला असून, या घटनेने भिवंडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
गेल्या काही काळापासून भिवंडीतील जिहादी धर्मांध मुसलमानांकडुन जाणीवपूर्वक दिंडीगडावर हिंदू धर्मातील चालीरिती विरोधात कारवाया सुरू झाल्या आहेत..त्याचाच एक भाग म्हणून रविवारी काही टवाळखोर जिहादी मुस्लिम युवक दुचाकींवरून दिंडीगडावर जात असताना त्यांच्या हातातील काळ्या पिशव्यांमध्ये मांस असल्याचे स्थानिक हिंदू तरुणांना दिसून आले. (Bhiwandi Dindigad Clash)
 
भगवान महादेवाचे हिंदूंचे पवित्र धार्मिक स्थळ त्यातच श्रावण महिना सुरू असल्याने गडावर अशा प्रकारे मांस नेताना हिंदू युवकांनी टोळक्याला हटकले , हे पाहताच त्या टवाळ खोरांनी उलट हिंदूंनाच मारहाण करण्यास सुरुवात केली असता संतपलेल्या हिंदू तरुणांनीही टोळक्याला चांगली अद्दल घडवली. (Bhiwandi Dindigad Clash)
 
रुग्णालयात घुसून जिहाद्यांचा हैदोस
 
दिंडी गडावर झालेल्या हाणामारीत दोन जखमी हिंदू युवकांना उपचारासाठी भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयात आणले असता त्यास ठिकाणी मोठ्या संख्येने जिहादी मुसलमानांनी जमून अक्षरशः हैदोस घातला १०० ते १५० जणांच्या जिहादी टोळीने हिंदू युवकांना जबर मारहाण केली मात्र पोलिसानी वेळीच भूमिका घेत हिंदू युवकांना जिहाद्यांपासून वाचवले अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. (Bhiwandi Dindigad Clash)
 
दोन पोलिस ठाण्यांत गुन्हे; अटकसत्र सुरू
 
या प्रकरणात तालुका पोलिस ठाणे येथे दिंडी गड राडा प्रकरणी तर भिवंडी शहरातील शांतिनगर पोलिस ठाण्यात रुग्णालयातील राड्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहे. रुग्णालयातील राड्या प्रकरणात पोलिसांनी तीन ते चार जिहाद्यांना अटक केली असून घेतले असून दिंडी गडावर झालेल्या राडा प्रकरणी दोन हिंदू तरुणांना आणि काही जिहादी मुस्लिमांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. (Bhiwandi Dindigad Clash)
 
मुस्लीम आमदारांचा पोलिसांवर दबाव
 
ही घटना घडतात भिवंडीचे आमदार रईस शेख धर्मांध जिहादी मुसलमानांचा बचाव करण्यासाठी धावत पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांवर दबाव टाकत होते. तर दुसरीकडे आमदार अबु आझमीही पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. दोघेही धर्मांध जिहाद्यांवर कारवाई न करता उलट हिंदू युवकांवर गुंन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची धमकी पोलिसांना देऊन दबाव आणत असल्याच हिंदू युवकांच्या नातेवाईकांनी म्हंटलं आहे. (Bhiwandi Dindigad Clash)
 
दिंडीगड बळकावण्याचा मुसलमानांचा प्रयत्न (Bhiwandi Dindigad Clash)
 
"मागील काही वर्षांपासून जिहादी धर्मांधांचा आमच्या दिंडीगडावर डोळा आहे.मागेही त्या ठिकाणी हिरवी चादर टाकण्याचा प्रकार घडला होता मात्र हिंदूंनी ती चादर उपटून टाकली.अमली पदार्थ घेऊन येणे,मद्यपान करणे,मांस आणून पार्ट्या करणे असे प्रकार हिंदूंच्या या पवित्र स्थानावर कब्जा करण्यासाठी मुद्दाम जिहाद्यांकडून करण्यात येत आहेत.कालचा झालेला हा प्रकार त्यातीलच असून दिंडीगडावर मुसलमानांचे येण्यास काहीच संबंध नाही हिंदूंच्या या स्थानावर मुस्लिमांना येण्याचे कारणच काय ?"
-संदीप भगत, कोकण प्रांत धर्मप्रसार प्रमुख, विहिंप
 
 
 




संबंधित मजकूर