"राहुल गांधीजी, तुमचे राजकारण म्हणजे केवळ ‘पेड पीआर’!"; राहुल गांधी यांच्या पत्राचा डॉ. अशोक उईके यांचा खरपूस समाचार

    25-Aug-2026   

मुंबई: (Ashok Uike vs Rahul Gandhi ) राहुल गांधी यांनी पुण्यातील ' छात्रो की गुंज ' कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांना पत्र लिहले. त्यात वसतीगृहामधील कथित विद्यार्थीनींच्या कथित वैदयकिय तपासणी आणि इतर बाबींचा उल्लेख केला आहे. आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ अशोक उईके यांनी राहुल गांधींच्या या पत्राचा खरपूस समाचार घेतला आहे.

"राहुल गांधीजी, तुम्ही जेव्हा येता, नेहमी उशीरच करता! तुमचे राजकारण म्हणजे निव्वळ ’पेड पीआर’ प्रोग्राम आहे," अशा अत्यंत धारदार शब्दांत त्यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे. विद्यार्थींनीची प्रेगनन्सी टेस्टची चर्चा पूर्णपणे खोटी आहे असे त्यांनी स्पष्ट केले. (Ashok Uike vs Rahul Gandhi )

तसेच पुणे, नागपूर आणि चंद्रपूर येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर महायुती सरकारने २२ ऑगस्ट रोजीच विद्यार्थ्यांशी थेट आणि सकारात्मक चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या. (Ashok Uike vs Rahul Gandhi )

सरकारच्या या तत्परतेमुळे विद्यार्थ्यांनी आपले उपोषण अधिकृतपणे मागे घेतले होते. परंतु, आंदोलन संपल्याचे भानही न ठेवता, राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन महायुती सरकारवर आरोप केले. यावर संतप्त प्रतिक्रिया देत डॉ. उईके म्हणाले, "ज्या दिवशी तुम्ही महाराष्ट्रात येऊन तुमचा स्क्रिप्टेड ’पेड पीआर’ शो करत होता, त्याच्या काही तास आधीच आदिवासी विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले होते. पण केवळ चर्चेत राहण्यासाठी आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी तुम्ही वस्तुस्थितीची मोडतोड केली. (Ashok Uike vs Rahul Gandhi )

डॉ. उईके यांनी महाराष्ट्रातील स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या कार्यपद्धतीवरही थेट बोट ठेवले. "राहुल गांधींना त्यांच्याच पक्षाच्या प्रदेश नेत्यांनी अंधारात आणि संभ्रमात ठेवले. आंदोलन मिटल्याची साधी पूर्वकल्पनाही स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणवणार्‍या राहुल गांधींना त्यांच्या प्रदेश नेत्यांनी दिली नाही," असा घणाघाती टोला उईके यांनी लगावला. (Ashok Uike vs Rahul Gandhi )

स्वतःच्या पक्षातील अंतर्गत गोंधळ आणि समन्वयाचा अभाव न सांभाळता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या जनप्रिय नेत्यावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसची कानउघाडणी केली.  (Ashok Uike vs Rahul Gandhi )

आदिवासी समाज काँग्रेसला गाडणार! (Ashok Uike vs Rahul Gandhi )

महायुती सरकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मूलभूत सुविधांसाठी कटिबद्ध असून रात्रं-दिवस काम करत आहे. वसतिगृहांचे प्रश्न तात्काळ सुटत आहेत. "निवडणूक जवळ आली की राहुल गांधींना आदिवासींचा पुळका येतो. काँग्रेसने वर्षानुवर्षे आदिवासींना केवळ व्होटबँक म्हणून वापरले. आता त्यांचे हे ढोंग उघडे पडले असून, महाराष्ट्रातील सुशिक्षित आदिवासी समाज काँग्रेसच्या या खोट्या सहानुभूतीला थारा देणार नाही आणि त्यांना आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल," - डॉ. अशोक उईके








योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर