मुंबई - (star pravah )स्टार प्रवाहच्या 'पाठराखीण' मालिकेत प्राजक्ता आणि आलोकच्या लग्नाची धामधूम सुरु झालीय. याचेच औचित्य साधून प्राजूच्या बॅचलरेटचा खास सोहळा दादरमधील मल्हार रेस्टॉरंट मध्ये रंगला. यावेळी भाग्याने प्राजक्ताला खास सरप्राइज दिलं.
लग्नाच्या आधीचा प्रत्येक क्षण खास असतो आणि त्यात बॅचलरेट पार्टी म्हणजे सेलिब्रेशनचा खास बहाणा! आपल्या लाडक्या प्राजूसाठी भाग्याने खास बॅचलरेट पार्टीचं आयोजन करत तिच्या या खास दिवसाला आणखी अविस्मरणीय बनवलं.
मस्ती, गप्पा आणि धमाल गेम्स खेळत बॅचलरेट पार्टीमध्ये प्राजू आणि भाग्याने मनसोक्त धमाल केलं. (star pravah)
प्राजूच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात होण्याआधी तिच्या बहिणीने दिलेलं हे खास सेलिब्रेशन अनोखं ठरलं. यावेळी भावुक होत प्राजक्ताने भाग्याचे आभार मानले. तसेच आजचा दिवस ती कधीच विसरू शकणार नाही असं भाग्याला सांगितले. (star pravah)