_202608241328252093_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
मुंबई - (Prajakta Mali)बदलत्या काळासोबत नात्यांकडे पाहाण्याचा दृष्टिकोनही बदलत आहे. लग्न, करिअर आणि बदलत्या नात्यांच्या विश्वात डोकावणाऱ्या ‘डिंक्स’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. अजय मोंगा यांच्या दिग्दर्शनाखाली आणि जितेंद्र राय व नितीन प्रकाश वैद्य यांच्या निर्मितीत साकारला जाणारा हा चित्रपट आजच्या पिढीच्या आयुष्याशी आणि त्यांच्या भावनिक गुंतागुंतीशी जोडलेला असल्याचे दिसतेय. विशेष म्हणजे, या चित्रपटात प्राजक्ता माळी एका नव्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे.
चित्रपटाच्या मुहूर्ताच्या निमित्ताने समोर आलेल्या प्राजक्ताच्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पिंक ब्लेझर, ब्लॅक शर्ट आणि शॉर्ट हेयर अशा लूकमध्ये प्राजक्ता दिसत असून तिच्या या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘डिंक्स’ अर्थात डबल इनकम नो किड्स ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवत आजच्या तरुण जोडप्यांच्या निवडी, नातेसंबंध, अपेक्षा आणि त्यातून निर्माण होणारे भावनिक प्रश्न या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.(Prajakta Mali)
दिग्दर्शक अजय मोंगा म्हणाले , “‘डिंक्स’ हा विषय म्हणजे आजच्या काळाची नात्यांकडे पाहाण्याची बदलती दृष्टी आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून प्राजक्ताचा लूक आजच्या काळाशी जोडलेला आहे. या लूकमुळे तिच्या व्यक्तिरेखेचा अंदाज येतो. प्राजक्तासोबत काम करण्याचा अनुभव खूप खास आहे आणि तिच्या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांना नक्कीच एक वेगळी बाजू पाहायला मिळेल.(Prajakta Mali)
निर्माते नितीन प्रकाश वैद्य म्हणाले , “आजच्या पिढीशी थेट संवाद साधणारा आणि त्यांना स्वतःच्या आयुष्याशी जोडून घेता येईल, असा विषय ‘डिंक्स’ मधून मांडत आहोत. अजय मोंगा यांची दृष्टी आणि प्राजक्ताची व्यक्तिरेखा या चित्रपटाला एक वेगळी ओळख देतील, याची आम्हाला खात्री आहे.(Prajakta Mali)
सायलेंट कॅनवास फिल्म्स व नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘डिंक्स’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याने आता या चित्रपटाची कथा नेमकी कोणत्या वळणावर जाते, प्राजक्ताची व्यक्तिरेखा काय असेल? तिच्यासोबत अजून कोण कलाकार पाहायला मिळतील आणि ‘डिंक्स’ या संकल्पनेमागचं भावविश्व चित्रपटातून कसं उलगडणार, याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.(Prajakta Mali)