पूजा चव्हाणचं “याड लागलं” गाणं सोशल मीडियावर होतंय व्हायरल !

    24-Aug-2026

pooja
 
 
 
मुंबई - (Pooja Chavan)प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक मनमोहक नविन गाणं “याड लागलं” प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. गाण्यात “पुन्हा कर्तव्य आहे” या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा चव्हाण आणि अभिनेता आकाश यादव यांची नवीन जोडी प्रेक्षकांना बघायला मिळतेय. समाधान पवार, सुबोध गोतपागर, शुभम यादव, आकाश यादव यांनी या गाण्याची निर्मिती व दिग्दर्शन केले असून गाण्याला दर्शन सुतार यांनी संगीत दिलंय. गायक निखिल मधाळे यांनी हे गाण गायलं आहे. शिवाय या गाण्याची गीतरचना आकाश यादव यांनी केलीय.
'याड लागलं' या गाण्याचे चित्रीकरण सचिन घाटगे यांनी केले असून व्हिडीओ एडीटींग आकाश यादव यांनी केले आहे. हे गाणं साताऱ्यातील दुर्गळवाडी मधील निसर्गरम्य ठिकाणी चित्रित करण्यात आलं आहे. हे गाणं अशा तरुण प्रेमकथांची कहाणी सांगतं, जे साधं व निस्वार्थ प्रेम करून भविष्याचे स्वप्न रंगवतात. पूजा आणि आकाशाची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली असून हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालंय. (Pooja Chavan)
 




संबंधित मजकूर