नाशकात ' लव्ह जिहाद'चे पेव

सहा महिन्यांत २२ घटना ; अल्पवयीन हिंदू तरुणी लक्ष्य

    24-Aug-2026
Love Jihad 
 
नाशिक : (Nashik Love Jihad Allegations) धार्मिक नागरी नाशिकमध्ये ' लव्ह जिहाद' च्या घटनांचे अक्षरश: पेव फुटले आहे. गेल्या सहा महिन्यांत नाशिक शहर आणि जिल्ह्यात तब्बल २२ हिंदू तरुणी 'लव्ह जिहाद' ला बळी पडल्याची गंभीर बाब उघड आली आहे. यांपैकी ११ घटनांमध्ये हिंदू धर्मातील अल्पवयीन तरुणींना ठरवून लक्ष्य करण्यात आले, असे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
 
शाळेतील 'फ्रेंडशिप' भोवली
 
पीडित मुलीचे वय अवघे १४, तर संबंधित आरोपी १६ वर्षांचा. दोघेही एकाच शाळेत; मुलगी आठवीला, तर आरोपी दहावीला. सुरुवातीला त्याने पीडितेसोबत मैत्री करताना हमारी सिर्फ फ्रेंडशीप है, फ्रेंडशीप मे तुझपे मुसिबत आए तो मै मदत करुंगा, और मुझपे मुसिबत आए तो तु मुझे मदत करेगी, असे गोड बोलून फसविण्यास सुरुवात केली.
 
मुलीची आई मुंबईला सरकारी नोकरीला, तर वडील नाशिकमध्येच मोठ्या हुद्द्यावर कामाला. त्यामुळे घरात पैशाची कमतरता नव्हती. त्याचाच फायदा घेऊन संबंधित मुस्लिम आरोपीने कधी आई आजारी, तर कधी बहिणीला अडचण सांगत पीडित मुलीकडून तब्बल नऊ लाख रुपये उकळले. तसेच तिला नको त्या अवस्थेत बघण्यासाठी बळजबरी केली. (Nashik Love Jihad Allegations)
 
मदत केली, जाळ्यात ओढले
 
पीडितेचे वय २४ वर्षे. खासगी कंपनीत नोकरी करत असताना कार्यालयात सहकाऱ्यांसोबत वाद झाला. पीडितेच्या वडिलांनी संबंधित बाब आपल्या मित्राला सांगितली. मित्राने पीडितेच्या कार्यालयात जाऊन संबंधितांना जाब विचारला. त्यातून पीडितेच्या मनात वडिलांच्या मित्राच्या बाबतीत निर्माण झालेल्या आपुलकीचा फायदा घेत त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
 
प्रेमाचे आमिष दाखवून त्याने शरीरसंबंधासाठी बळजबरी करण्यास सुरुवात केली. तसेच केलेल्या संबंधांचे फोटो आणि चित्रीकरण करून पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने गुन्हा दाखल केला. (Nashik Love Jihad Allegations)
 
शेजारी आला आणि...
 
केवळ साडे सोळा वर्षे वय असलेल्या पीडितेच्या घराशेजारीच मुस्लिम कुटुंब भाड्याच्या खोलीत राहायला आले. दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यातून दोघांमध्ये सातत्याने बोलणे सुरू झाले. त्यातूनच पुढे नराधमाने पीडितेचा शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. त्याची हिंमत इतकी वाढली होती की, पीडितेच्या घरात येऊन तो शारीरिक छळ करत होता. (Nashik Love Jihad Allegations)
 
असे ओढले जाते जाळ्यात
 
सोशल मीडियामुळे अनेक हिंदू तरुणी लव्ह जिहादला बळी पडल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. नाशिकमध्ये घडलेल्या या २२ घटनांमध्ये इन्स्टाग्रामवरील मुस्लिम धर्मांधांचे प्रोफाइल बघून तो आवडल्याचे पीडित तरुणींनी सांगितले. (Nashik Love Jihad Allegations)
 
इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर तासनतास एकमेकांशी बोलणे सुरू झाले. त्यातून हे नराधम असे काही प्रेमाचे जाळे फेकतात की, तरुणींना सहज भुरळ पडते. त्यामुळेच आपण फसवले जात आहोत, याची पीडितेला जराशीही शंका येत नाही. (Nashik Love Jihad Allegations)
 
कॉर्पोरेट जिहादमध्येही हीच ट्रिक
 
नाशिकमध्ये अगदी ताजे प्रकरण असलेल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातही सुरुवातीला गोड बोलून हिंदू तरुणींना जाळ्यात ओढण्यात आल्याचे निदा खान प्रकरणातील पीडित तरुणीचे वकील ॲड. मिलिंद कुरकुटे यांनी सांगितले. सुरुवातीला सोबत जेवण्यासाठी आग्रह झाल्यानंतर संबंधित हिंदू युवतीने उपवास असल्याचे सांगितले. (Nashik Love Jihad Allegations)
 
हिंदू धर्मात उपवासाला फराळ केला जातो. मात्र, मुस्लिम धर्मात उपवास असताना आम्ही थुंकीदेखील गिळत नाही, असे सांगत आपला धर्म कसा चांगला, हे तिच्या मनावर बिंबवण्यात आले. त्यानंतर तिचा ब्रेनवॉश करून मशिदीत नेण्यात आले. मुलींसाठी हिजाब कसा चांगला, हे पटवून देत तिचे धर्मांतर करण्याचा प्रकार घडला. (Nashik Love Jihad Allegations)
 
पालकांनी मुलांवर लक्ष देण्याची गरज
 
आपली मुले बाहेर जाताना कोणासोबत ते काय करत आहेत, याची वेळोवेळी पालकांनी माहिती घेतली पाहिजे. तसेच त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, याचीही माहिती घेतली पाहिजे. मुलांना फक्त चांगली लाइफस्टाइल देण्यापेक्षा ते चुकत तर नाही ना, हे देखील बघितले पाहिजे. आपण सर्व सुखसोयी देतो म्हणजे आपले कर्तव्य संपले, असे न करता आपल्या पाल्यांवर चांगले संस्कार करण्याची गरज निर्माण झाली असून हिंदू धर्माची शिकवण देण्याची गरज निर्माण झाली आहे. (Nashik Love Jihad Allegations)
 
सोशल मीडिया कॉमन फॅक्टर (Nashik Love Jihad Allegations)
 
या घडलेल्या सर्व घटनांमध्ये पीडितांचे वय १२ ते २४ वर्षे इतके आहे. तसेच सोशल मीडियाचा अति वापर हा सर्वात मोठा कॉमन फॅक्टर आहे. यासोबतच २२ पैकी सात ते आठ प्रकरणांमध्ये आरोपींचे नाव दानिश आहे. ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांमध्ये लव्ह जिहादच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. तपासादरम्यान संबंधित तरुणाचे इन्स्टाग्रामवरील प्रोफाइल आवडल्याचे बहुतांश पीडितांनी सांगितले. यासोबतच अगदी कोवळ्या वयात हिंदू तरुणींना फसवून शरीरसंबंधाचा चटका लावला जातो. त्यामुळे आपली मुले सोशल मीडिया वापरताना ते नेमके काय बघत आहेत, हे पालकांनी तपासले पाहिजे. तसेच मुलांचा मोबाईल वेळोवेळी तपासला गेला पाहिजे. – मिलिंद कुरकुटे, पीडितांचे वकील
 
 




संबंधित मजकूर