मुंबई - (Mirzapur)बहुप्रतिक्षित ‘मिर्झापूर: द मूव्ही’ च्या प्रमोशनसाठी चित्रपटाची टीम बुधवारी पुणे शहरात दाखल होणार आहे. लोकप्रिय ‘मिर्झापूर’च्या जगाला आता पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असल्याने, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे.
ओटीटीवर आपल्या दमदार कथा, रंजक व्यक्तिरेखा, थरारक घडामोडी आणि संवादांमुळे ‘मिर्झापूर’ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता याच लोकप्रिय विश्वाची कथा आणखी मोठ्या आणि भव्य स्वरूपात ‘मिर्झापूर: द मूव्ही’मधून प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात होणाऱ्या या खास भेटीत टीम चाहत्यांशी संवाद साधत चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवणार आहे. (Mirzapur)
‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी ही भेट विशेष ठरणार असून, चित्रपटाची टीम पुण्यात येणार असल्याने शहरातील चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मोठ्या पडद्यावर ‘मिर्झापूर’चा अनुभव कसा असणार, याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. त्यामुळे या प्रमोशनल दौऱ्याकडे चाहत्यांचे आणि मनोरंजनप्रेमींचे लक्ष लागले आहे. (Mirzapur)
ॲमेझॉन MGM स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘मिर्झापूर: द मूव्ही’चे दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केले आहे, तर चित्रपटाची कथा आणि लेखन पुनीत कृष्णा यांनी केले आहे. एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कासिम जगमगिया आणि विशाल रामचंदानी हे चित्रपटाचे सह-निर्माते आहेत.
पुण्यातील या खास प्रमोशनल भेटीनंतर ‘मिर्झापूर: द मूव्ही’ बद्दलचा माहोल आणखी रंगणार आहे. ‘मिर्झापूर: द मूव्ही’ ४ सप्टेंबर २०२६ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Mirzapur)