'माझगावचा मोरया' गणपती आगमन मिरवणुकीत जिहाद्याकडून अंडीफेक!

पोलिसांकडून नॉन-बेलेबल एफआयआर दाखल; हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक

    24-Aug-2026   
Mazgaon Ganpati
 
मुंबई : (Mazgaon Ganpati) मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी माझगाव येथे एक संतापजनक आणि अत्यंत अनुचित प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. 'माझगावचा मोरया' या मंडळाचे यंदाचे ८० वे वर्ष असून मोठ्या संख्येने गणेशभक्त अत्यंत उत्साहाने बाप्पाच्या आगमन सोहळ्यात सहभागी झाले होते. मात्र या प्रसंगी एका अज्ञात जिहाद्याने बाप्पाच्या मूर्तीजवळ अंडी फेकली, ज्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
 
अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्र अध्यक्ष हितेश चंद्रकांत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, माझगावच्या मोरयाची भव्य आगमन मिरवणूक निघाल्यानंतर कालांतराने ती कॉन्टिनेंटल हाईट्स सोसायटीच्या आवारात येऊन पोहोचली. सोसायटीच्या 'सी' विंगमधून अज्ञाताने थेट गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ अंडी फेकून मारल्याचा आरोप गणेशभक्तांकडून करण्यात आला आहे. या निंदनीय कृत्यामुळे मिरवणुकीत उपस्थित गणेशभक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. (Mazgaon Ganpati)
 
 
 
या घटनेची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते तसेच अन्य गणेश मंडळातील गणेशभक्त सुद्धा मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. यावळी धार्मिक भावना दुखावणाऱ्या या प्रवृत्तींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरण्यात आली. (Mazgaon Ganpati)
 
अशी माहिती आहे की, याप्रकरणी पोलिसांनी अंडी फेकणाऱ्या अज्ञात जिहादी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ आणि १६८ अंतर्गत नॉन-बेलेबल एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत गणेशभक्तांना आश्वस्त केले आहे की, कॉन्टिनेंटल हाईट्स सोसायटीच्या 'सी' विंगमधील सीसीटीव्ही फुटेज आणि तपास यंत्रणेद्वारे संबंधित आरोपीचा तातडीने शोध घेतला जाईल व त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. (Mazgaon Ganpati)
 
८० वर्षांची परंपरा असलेल्या माझगावच्या मोरयाच्या आगमन सोहळ्यात असा प्रकार घडवून मुंबईतील शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक शासन झालेच पाहिजे, अशी ठाम मागणी आता समस्त गणेशभक्त आणि हिंदू संघटनांकडून केली जात आहे. (Mazgaon Ganpati)
 
अफवांवर विश्वास ठेऊ नका
 
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी जयंत मीणा घटनास्थळी पोहोचले. वाढता जमाव पाहता त्यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देऊन किंवा गोंधळ घालून परिस्थिती बिघडवू नका, पोलिसांवर विश्वास ठेवा आणि कायद्याला त्याचे काम करू द्या, असे आवाहन त्यांनी केले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिसरात बंदोबस्त वाढवला. नागरिकांना अफवा किंवा भडकावू माहितीवर विश्वास न ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले. (Mazgaon Ganpati)
 
तर हिंदूंच्या आक्रोशाला आवरणे कठीण गेले असते
 
अशा स्वरूपाच्या विकृत प्रवृत्तीचे समाजकंटक हिंदूंचे सण आले की, त्यास गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. दोन गटांत तणाव निर्माण करू पाहतात. सदर घटनेनंतर रविवारी रात्री मोठ्या संख्येने हिंदू समाज संघटित झाला होता. बाप्पाच्या मूर्तीपासून दहा फूट अंतरावर अंड पडले. तेच जर मूर्तीवर पडले असते, तर या हिंदूंच्या आक्रोशाला आवरणे कठीण गेले असते. या एका घटनेनंतर अनेक गणेशोत्सव मंडळातील गणेशभक्त घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मनात याविषयी तीव्र संताप होता. मात्र पोलिसांनी दिलेल्या कारवाईच्या आश्वासनानंतर सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, सर्वांचे लक्ष पोलीस कारवाईकडे लागले आहे. आरोपीला तात्काळ अटक व्हावी, अशी सर्वांची मागणी आहे.(Mazgaon Ganpati)
 
- अखिल कासार, अध्यक्ष, माझगाव सार्वजनिक उत्सव मंडळ
 
हिंदूंच्या सणांना गालबोल लावण्याचे जिहाद्यांना ट्रेनिंग मिळते
 
माझगावमध्ये घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. हिंदूंचे सण आले की अशा जिहादींकडून अंडीफेक, दगडफेक यांसारख्या घटना वारंवार होतात. त्यांना हिंदूंच्या सणांना गालबोल लावण्याचे ट्रेनिंगच मिळालेले असते. हिंदू आता गप्प बसणार नाहीत, जर आमच्या सणांमध्ये समोरून दगड आला तर त्यांच्या सणांच्यावेळी सुद्धा योग्य प्रत्युत्तर दिले जाईल. हिंदूंसमोर शक्तीप्रदर्शन केले, मोहरमच्या वेळी भव्य मिरवणूक काढून धिंगाणा घातला अशावेळी हिंदू शांत बसतो म्हणजे हिंदूंच्या अहिंसकपणाला नपूंसकपणा समजू नका. वेळ आल्यास हिंदू सुद्धा मागेपुढे पाहणार नाही हे जिहाद्यांनी ध्यानात ठेवावे. (Mazgaon Ganpati)
 
- राजीव चौबे, विभाग मंत्री (मुंबई शहर), विश्व हिंदू परिषद
 
संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे २८ लाख गणेश मूर्तींची स्थापना होणार
 
मुंबईत सुमारे १० हजार ६०० सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. त्यापैकी केवळ २ हजार ५०० मंडळांनी १० दिवसांच्या उत्सवासाठी परवानगी घेतल्याची माहिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे २८ लाख गणेश मूर्तींची स्थापना होण्याचा अंदाज आहे. मुंबईत मंडळाच्या परवानगीसाठी ऑनलाइन सिंगल-विंडो प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यामध्ये बीएमसीसोबत स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांची एनओसी देखील ऑनलाइन मिळू शकेल. अर्ज १३ सप्टेंबरपर्यंत करता येतील. (Mazgaon Ganpati)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर