मुंबई : (Amravati hospital fire )अमरावतीतील घटनेची पोलिस कसून चौकशी करत आहे. तीन मुलांचा मृत्यू होणे ही घटना कुणालाही शोभणारी नाही. त्यामुळे यात सदोष मनुष्यवध झाला असल्यास आम्ही त्यावर कारवाई करू, अशी भूमिका महसुलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली.
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) सोमवारी पहाटे चार वाजता लागलेल्या आगीत उपचार घेत असलेल्या तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. यावर माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “लवकरच आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि आरोग्य सचिव घटनास्थळी जाणार आहेत. सहा बालकांना आम्ही खासगी रुग्णालयात हलवले असून ३६ बालके बचावली आहेत. प्रशासनाने खूप प्रयत्न केले असून मी स्वत: यावर लक्ष ठेवून आहे. या घटनेत तीन बालके दगावली असून हे दुर्दैवी आहे. त्या मुलांना परत आणता येत नाही पण प्रत्येक परिवाराला ५ लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. (Amravati hospital fire )
तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ६ बालकांचीही पूर्ण व्यवस्था आम्ही करणार आहोत. चौकशीअंती ही घटना पुढे येईल. पण तांत्रिक चुकांमुळे किंवा एखाद्या अग्निशामक व्यवस्थेमध्ये झालेल्या बिघाडामुळे जे काही घडले असल्यास त्याचा अहवाल येईल. त्यावर नंतर भाष्य करु. पण मला असे वाटते की. अशा घटना पुन्हा या राज्यामध्ये होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत. ज्यांच्या चुकीमुळे ही घटना घडली असेल त्यांच्यावर शासन कडक कारवाई करेल.” (Amravati hospital fire )
🟧 24 - 08 - 2026 | 📍मुंबई | माध्यमांशी संवाद
तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने अग्निशामक यंत्रणा लावण्यात आली असेल तर जबाबदार अधिकारी, कर्मचारी किंवा कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. चौकशीनंतर जबाबदार व्यक्तीवर आम्ही निश्चित गुन्हा दाखल करू.… pic.twitter.com/TT6qFXXPkD
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, “कुठल्या वेळी काय वक्तव्य करावे हे राजकीय नेत्यांना कळले पाहिजे. त्या स्वत: तिथे पालकमंत्री होत्या. अशा घटनावर राजकारण होऊ शकत नाही, हे त्यांना कळले पाहिजे. गरीब-श्रीमंताचा इथे वाद नाही. सर्व बालके एकाच ठिकाणी होते. ३६ बालकांना वाचवण्यात आले असून ६ बालके खासगी रुग्णालयात आहेत. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. पण प्रत्येकवेळी सरकारला टार्गेट करणे योग्य नाही. तुम्ही तिथे घटनेची पाहणी करण्याकरीता गेल्या होतात की, राजकारण करण्याकरीता?” (Amravati hospital fire )
ते पुढे म्हणाले की, “जिथे अग्निशामक असतात त्याची देखभाल झाली की, नाही? वायुगळती झाल्यामुळे पाण्याचे फवारे का सुरु झाले नाही? ते कधी लावले, त्याची निगा राखली गेली का? असे अनेक तांत्रिक मुद्दे आहे. तांत्रिक पद्धतीने एखाद्या अधिकाऱ्याने किंवा कंत्राटदाराने ते चुकीचे लावले असल्यास हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे. पण नेमके घटनेच्या मुळात जावे लागेल.” (Amravati hospital fire )
देशात काँग्रेसची पत गेली
“देशातून काँग्रेस पक्षाची पत गेली असून त्यांचा जनाधार गेला आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षाला कसे वाचवता येईल आणि पक्षाला वाचवताना युवकांचा वापर कसा करता येईल, असा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांशी साधलेला संवाद विकसित महाराष्ट्राला नवी दिशा देणारा होता. पण राहुल गांधींचा प्रयत्न राजकीय असून त्यांना यातून आपला पक्ष मजबूत करायचा आहे. युवकांच्या मनात संभ्रम निर्माण करून आपल्या संस्कृतीबद्दल वेगळे मार्गदर्शन करून त्यांची माथी भडकवण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही वंदे मातरम् चे दोनच कडवे म्हणणार हे राहुल गांधी युवकांना सांगणार आहेत का? त्यांचे आंदोलन म्हणजे विद्यार्थ्यांची गुंज नसून पुन्हा सत्तेत येण्यासाठी राहुल गांधींची गुंज आहे,” अशी टीकाही मंत्री बावनकुळे यांनी केली. (Amravati hospital fire )
विरोधकांची दुकानदारी सुरु
“युवकांच्या व्यासपीठावरून आपला पाया मजबूत करता येतो असे विरोधकांना वाटत असल्याने ते सगळे माथेफिरुंसारखे निघाले आहेत. जिथे युवक दिसेल तिथे आपले दुकान मांडायला तयार झाले आहेत. पण आजचा युवक हा आमच्यापेक्षा २० पटीने अडव्हान्स आहे. त्यांना चांगल्या पद्धतीने पुढे नेल्यास आपला भारत जगातील सर्वोत्तम भारत बनू शकतो, ही भूमिका महत्वाची आहे. पण विरोधकांना आपली दुकानदारी करायची आहे,” असेही ते म्हणाले. (Amravati hospital fire )
महायुतीच्या समनव्य समितीच्या बैठकीबाबत बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “समन्वय समितीचे आम्ही सहाही मंत्री प्रत्येक आठवड्यात बसून चर्चा करतो. यातून आम्ही अनेक गोष्टी मार्गी लावल्यात. आमच्या सहा मंत्र्यांनाही काही मार्गदर्शन हवे असते. अशावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्यासोबत बसून काही मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.” (Amravati hospital fire )
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....