खटाव समिती अहवालानुसार भाडेवाढ दयावी-रिक्षा चालक मालक संघटनेची मागणी

    24-Aug-2026   
Dombivli Rickshaw Fare Hike


डोंबिवली (Dombivli Rickshaw Fare Hike): डोंबिवली रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने १ सप्टेंबर पासून लागू केलेल्या १ रु. रिक्षा दरवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि रिक्षाचालकांना खटाव समिती अहवालानुसार भाडेवाढ करावी अशी मागणी परिवहन मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.(Dombivli Rickshaw Fare Hike)
 
महागाईने रिक्षाचालकांचे जगणे हैराण करून टाकले आहे. नुकत्याच पार पडलेल्या मंत्री मंडळ बैठकीत सरकारने १ रुपयांची रिक्षा भाडे दरवाढ लागू केली आहे. ही दरवाढ १ सप्टेंबर पासून लागू केली आहे. ही भाडेवाढ अत्यंत तुटपुंजी असून रिक्षाचालकांवर अन्याय करणारी आहे. मागील 2 वर्षांपासून रिक्षाचालकांना कोणतीही भाडेवाढ देण्यात आली नाही. खटवा समितीच्या अहवालानुसार महागाई निर्देशांकानुसार दरवर्षी भाडेवाढ द्यावी असे त्यात स्पष्ट नमूद असतानाही हा अहवाल पाळला गेला नाही असा रिक्षा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. खटवा ही शासनाने नेमलेली समिती आहे. हा अहवाल २०१४ पासून लागू आहे. असे असताना ही त्यांचा अहवाल पाळला जात नाही. गेल्या अकरा वर्षात केवळ पाच वेळा भाडेवाढ झाली आहे. रिक्षा भाडे दरवाढ दरवर्षी होणे गरजेचे होते. उदा. पहिले 18 रुपयांवरून 19 रुपये, नंतर 21 रुपये, 23 रुपये, 26 रुपये आणि आता 1 सप्टेंबरपासून 27 रुपये. झालेली आहे दरवर्षी भाडेवाढ अपेक्षित असताना रिक्षा चालकांच्या तोंडाला पाने पुसले जात आहे असे संघटनेकडून सांगितले आहे.(Dombivli Rickshaw Fare Hike)
 
एकीकडे रिक्षा भाडे दरवाढ मिळत नाही. तर दुसरीकडेमहागाईचा कहर झाला आहे. नवीन रिक्षा पूर्वी 1.5 लाखात मिळत असे तिचं आज रिक्षा 3 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पेट्रोल आणि सीएनजीचे दर गगनाला भिडले आहेत. देखभाल खर्च स्पेअर पार्ट च्या किमती गगनाला भिडल्या आहेत. टायरची किंमत 700 वरून 1400 रु. झाली. पंचर 20 रु. वरून 100 रु. झाले. सीएनजी बाटली पासिंग पूर्वी 500 रु. होते, आता 3000 रु. द्यावे लागतात. ज्या वेळेला भाडे वाढ होते त्या वेळेलामीटर कॅलिब्रेशन, भाडेवाढीनंतर मीटर कॅलिब्रेशनसाठी 1000 ते 1500 रु. खर्च व दिवसभर गाडी बंद ठेवावी लागते.(Dombivli Rickshaw Fare Hike)
 
प्रवाशांकडून मिळालेल्या पैशातून रिक्षाचालकाला गाडीचा मेंटेनन्स, कर्जाचे हप्ते, घरखर्च, मुलांचे शिक्षण, घरात आजारी असल्यास त्यांची औषधे हे सर्व करावे लागते. एवढ्या कमी भाड्यात कुटुंब चालवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करून 1 सप्टेंबर रोजीच्या 1 रुपया भाडेवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करावा व खटवा समितीच्या अहवालानुसार महागाई निर्देशांकानुसार योग्य व सन्मानजनक भाडेवाढ द्यावी. जर योग्य निर्णय झाला नाही तर शेतकऱ्यांप्रमाणे रिक्षाचालकांवरही उपासमारीने आत्महत्या करण्याची वेळ येईल याकडे डोंबिवली रिक्षा चालक-मालक संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता माळेकर यांनी लक्ष वेधले आहे.(Dombivli Rickshaw Fare Hike)
 
 
 




संबंधित मजकूर