कल्याण : (Doctor Safety) कल्याण-डोंबिवलीत डॉक्टर सुरक्षित आहेत का? असा संतप्त सवाल उपस्थित करणारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पाठोपाठ आता कल्याण पूर्वेतील भानु ज्योत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांना रुग्णाच्या मुलाने केबिनमध्ये घुसून बेदम मारहाण केली.
कोळसेवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असला, तरी डॉक्टरांवर लागोपाठ होणाऱ्या हल्ल्यांमुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. (Doctor Safety)
एका रुग्णासोबत आलेला त्याचा मुलगा विनीत देशमुख डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला होता. डॉक्टर योगेंद्र जयस्वाल हे रुग्णाला त्याच्या आजाराबाबत समजावून सांगत असताना रुग्णाच्या मुलगा विनीत देशमुख संतापला. त्यानंतर रुग्णाने स्वत आपल्या मुलाला केबिनच्या बाहेर जाण्यास सांगितले.
मात्र, काही वेळाने तो पुन्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला आणि डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. (Doctor Safety)
कल्याण डोंबिवली महापालिका रुग्णालयात पुन्हा एकदा डॉ आणि कर्मचारी यांना मारहाण प्रकार म्हणजे नित्याचीच बाब झाली आहे कायदा आणि सुव्यवस्था चा धाक अजिबात राहिलेला नाही. तत्काळ कायदेशीर कारवाई करावी आणि सुरक्षेत वाढ करावी@ThaneCityPolicepic.twitter.com/6L2FjdARkI
या घटनेमुळे रुग्णालयातील वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला.या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. (Doctor Safety)
दरम्यान, रुग्णांना सेवा द्यायची कशी आणि रुग्णालये सुरक्षितपणे चालवायची कशी, असा प्रश्न डॉक्टरांकडून उपस्थित केला जात आहे. (Doctor Safety)