मुंबई : (Chandigarh MD Drugs) चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे एमडी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरू असल्याचे नुकतेच उघडकीस आले. मीरा रोड येथील नयानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अमलीपदार्थ प्रकरणाच्या तपासादरम्यान हे प्रकरण समोर आले. महाराष्ट्र राज्य अमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे यांच्या पथकाने हाजगोळी येथील पोल्ट्री फार्मवर छापा टाकला असता सुमारे २०८ ग्रॅम तयार एमडी ड्रग्जसह एकूण १ कोटी १३ लाख ५१ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बेळगाव गांधीनगर येथील मत्तीन दफेदार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.(Chandigarh MD Drugs)
मिळालेल्या माहितीनुसार, नयानगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २१(क), २२ (क), २९ तसेच बीएनएस कलम २३८, १११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Chandigarh MD Drugs)
आरोपी इरफान सलीम याला पोलिसांनी अटक केली असून त्याची सध्या कसून चौकशी सुरु आहे. या दरम्यान इरफान सलीमने हाजगोळी येथील पप्पू विठ्ठल मलतवाडर यांच्या मालकीच्या पोल्ट्री फार्ममध्ये एमडी निर्मितीचा सेटअप उभारण्यात आल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी संतोष बसरीकट्टी व पप्पू मलतवाडकर यांना अधिक तपासासाठी ताब्यात घेतले.(Chandigarh MD Drugs)
पथकाने केलेल्या कारवाईत तयार एमडी, कच्चे रसायन, विविध रसायने, फिल्टर पेपर, डिजिटल थर्मामीटर, घनता मापके, टेस्ट ट्यूब, प्रयोगशाळेतील काचेची भांडी, इंडिकेटर पेपर, हॅन्ड ग्लोव्हज, स्पीड कंट्रोलर, ओव्हन, मिक्सिंग मोटार आदी साहित्य जप्त केले आहे. या कारखान्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे आणि तयार एमडीचा पुरवठा कुठे केला जात होता, याचा तपास यंत्रणेकडून सुरू आहे.(Chandigarh MD Drugs)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक