
मुंबई - (Abhiram Bhadkamkar)जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाचे पडसाद आता देशभर उमटतायेत. बऱ्याच लोकांनी या आंदोलनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता ज्येष्ठ लेखक- अभिनेता-दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनीही या आंदोलनाचा समाचार घेत राष्ट्रहिताच्या बाजूने बोलणाऱ्या कलाकारांनाच का ट्रोल केलं जातं ? असा सवाल विचारला आहे.
भडकमकर म्हणाले, आपल्या एकूण वैचारिक विश्वामध्ये एक प्रवाह असा मांडला गेलाय की पत्रकार, लेखक, कलावंत, विचारवंत यांनी कायम व्यवस्थेच्या विरुद्धच असलं पाहिजे. व्यवस्थेच्या विरुद्ध असणं म्हणजे काय? तर व्यवस्थेवरती टीका करणं ! समजा एखादा कलावंत जर सरकारच्या बाजूनी बोलायला लागला तर लगेच तो व्यवस्थेविरुद्ध बोलत नाही असा लोक घेतात. लगेच याला पदमश्री पाहिजे असेल असाही सूर निघतो. मग मी पण माझ्या मित्रांना विचारतो की ठीक आहे आता जे लोक सरकारचं कौतुक करतायेत त्यांना पद्मश्री हवी आहे ना ?, मग आता जे सरकारचा विरोध करतायेत आणि ज्यांना मागच्या सरकारकडून पद्मश्री मिळालेली आहे याचा अर्थ ते त्यावेळेचे कर्ज फेडतायेत असा घेऊया का ? आपण या देशाच्या पद्म पुरस्कारांचा अपमान करतो आहोत असं आपल्याला वाटत नाही का ? तर हि सगळ्या बाजूने कलाकारांची गोची होत असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. (Abhiram Bhadkamkar)
तसेच बरेच जणं व्हियूझ आणि लाईक्ससाठीच आंदोलनात या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी व्हियूझ आणि लाईक्ससाठी पोलीस आणि आर्मीचा अपमान करणं चुकीचं असल्याचं अभिराम भडकमकर यांनी सांगितलं. (Abhiram Bhadkamkar)
त्यांनी तिथे जाऊन कितीही लाईक्स मिळवले असले आणि एका गटामध्ये कट्टर गटामध्ये प्रचंड टाळ्या मिळवल्या असल्या तरी समाजाच्या सुप्त मनामध्ये हे कधीही आवडत नाही. आपल्या जवानांबद्दल बद्दल बोललेलं लोकांना आवडत नाही. स्त्रियां बद्दल अशा पद्धतीने बोललेलं आवडत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की सोशल मीडियावर कितीही धुराळा यांनी उडवला असला तरी सामान्य माणसांनी हे चुकीचं झाल्याची नोंद घेतली असल्याचं हि भडकमकर म्हणाले.
(Abhiram Bhadkamkar)