द बायोस्कोप बग्स’ फिल्म सोसायटीचे डोंबिवलीत भव्य उद्घाटन; विद्यार्थ्यांना चित्रपट अभ्यासाची नवी दृष्टी - वाचा सविस्तर

    23-Aug-2026
The Bioscope Bugs
 
डोंबिवली : (The Bioscope Bugs) डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पेंढारकर कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये चित्रपटांविषयी जाण, कलात्मक दृष्टीकोन आणि सामाजिक भान विकसित करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या 'द बायोस्कोप बग्स' या इन-हाऊस फिल्म सोसायटीचे भव्य उद्घाटन २२ ऑगस्ट २०२६ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
 
या विशेष कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ भूलतज्ज्ञ व चित्रपट समीक्षक डॉ. सुनील पुणतांबेकर, प्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अक्षय शिंपी तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत राव होते. कार्यक्रमाचे संयोजक डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ , मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल लवंगारे होते. तर प्रभारी प्राचार्य डॉ. कैलास जगदेव आणि सेल्फ फायनान्स कोर्स उपप्राचार्या डॉ. रीया रुपानी यांनी सहसंयोजक म्हणून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावली. (The Bioscope Bugs)
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी 'द बायोस्कोप बग्स' या चित्रपट मंडळाची संकल्पना, उद्दिष्टे आणि आगामी उपक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. विद्यार्थ्यांना केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि कलात्मक माध्यम म्हणून चित्रपटांकडे पाहण्याची प्रेरणा देणे, विविध दर्जेदार चित्रपटांचे प्रदर्शन, चर्चासत्रे, चित्रपट रसास्वाद कार्यशाळा हे या मंडळाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले. (The Bioscope Bugs)
 
प्रमुख पाहुणे डॉ. सुनील पुणतांबेकर यांनी आपल्या मनोगतात चित्रपट हे समाजाचे प्रतिबिंब असून विद्यार्थ्यांनी चित्रपटांचा अभ्यास चिकित्सक दृष्टीकोनातून करणे आवश्यक आहे. उत्तम आरोग्यासाठी जसे सकस अन्न आवश्यक असते तसे उत्तम बौद्धिक आरोग्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले. अक्षय शिंपी यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेला वाव देण्याचे आवाहन करत चित्रपटाकडे पाहताना मिरर पॅटर्न (चित्रपट हा स्वतःचीच प्रतिमा भासणे) व विंडो पॅटर्न (जगण्याच्या अपरिचित भागाशी ओळख करून देणे) अशा दोन बाजू उलगडून संगत उपस्थितांना नवी दृष्टी दिली. कार्यक्रमात ऑस्कर पुरस्कार प्राप्त 'द एलिफंटा विसपेएअर' हा चित्रपट (विंडो पॅटर्न) व ('Interior Cafe Night' )'इंटिरियर कॅफे नाईट' (The Bioscope Bugs)
 
ह्या (मिरर पॅटर्न) लघुचित्रपटाचे विशेष प्रदर्शन केले, त्यावर प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना चित्रपटाचे विस्तृत समीक्षण केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील चित्रपटांविषयीच्या चर्चेमध्ये उत्साहाने भाग घेतला. (The Bioscope Bugs)
 
डॉ. प्रशांत राव यांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत महाविद्यालयाच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक परंपरेला बळकटी देणारा हा उपक्रम असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये विचारमंथन, संवाद आणि सर्जनशीलता वाढविण्यासाठी 'द बायोस्कोप बग्स' महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (The Bioscope Bugs)
 
पूर्ण ' वाॅच, थिंक, डिस्कस (Watch, Think, Discuss') या ब्रीदवाक्याला अनुसरून विद्यार्थ्यांमध्ये चित्रपट संस्कृतीची जाणी आणि नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी 'द बायोस्कोप बग्स' ही फिल्म महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी, माजी विद्या चित्रपटप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. ह्या कार्यक्रमाची धुरा डॉ. अमला पटवर्धन ह्यांनी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या सहकार्याने समर्थपणे सांभाळली. प्रा. पूजा देशपांडे-मुळ्ये आणि प्रा. पूजा म्हात्रे ह्यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले. प्रा, रश्मी मिश्रा ह्यांनी आभारप्रदर्शन केले. (The Bioscope Bugs)
 
 




संबंधित मजकूर