रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीतून ५० क्षयरुग्णांना ‘निक्षय पोषण सहाय्य’

    23-Aug-2026
The Rotary Club of Dombivli
 
कल्याण : (The Rotary Club of Dombivli) क्षयरोगमुक्त भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि क्षयरुग्णांच्या उपचार प्रक्रियेत समाजाचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांनी निक्षय मित्र म्हणून पुढाकार घेत ५० क्षयरुग्णांच्या पोषणाची जबाबदारी स्वीकारली. या उपक्रमांतर्गत ५० क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्याकरीता रोटरी भवन, नानासाहेब धर्माधिकारी मार्ग, डोंबिवली पूर्व येथे दि २१ ऑगस्ट रोजी निक्षयमित्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 
क्षयरोग हा केवळ वैद्यकीय आजार नसून त्याचा रुग्णांच्या आर्थिक व सामाजिक जीवनावरही परिणाम होतो. त्यामुळे औषधोपचारासोबत रुग्णांना पौष्टिक आहार, मानसिक आधार आणि समाजाचा पाठिंबा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. ही गरज ओळखून रोटरी क्लबने पुढाकार घेतला असून, निक्षय मित्र उपक्रमाच्या माध्यमातून क्षयरुग्णांच्या उपचारात समाजाची भागीदारी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली आहे.(The Rotary Club of Dombivli)
 
रोटरी क्लब ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि समाजातील गरजू घटकांसाठी विविध आरोग्य, शिक्षण व सामाजिक उपक्रम राबविणारी संस्था म्हणून कार्यरत आहे. ‘सेवा हीच खरी सामाजिक बांधिलकी’ या भावनेतून रोटरी क्लबने आरोग्य क्षेत्रात सातत्याने योगदान दिले आहे. विशेषतः क्षयरोगासारख्या आजाराच्या निर्मूलनासाठी शासनाच्या प्रयत्नांना सामाजिक संस्थांची साथ मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.(The Rotary Club of Dombivli)
 
यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ दीपा शुक्ल, शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ सादिया पिंजारी, शहर क्षयरोग अधिकारी डॉ पौर्णिमा ढाके आणि वैद्यकिय अधिकारी डॉ शीतल पाटील आणि क्षयरोग विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. (The Rotary Club of Dombivli)
 
रोटरी क्लब चे प्रेसिडेंट अथर्व जोशी यांनी निक्षय मित्र म्हणून रोटरी क्लबने स्वीकारलेला हा उपक्रम केवळ पोषण आहार देण्यापुरता मर्यादित नसून, ‘तुम्ही एकटे नाही, समाज तुमच्या सोबत आहे’ हा विश्वास क्षयरुग्णांमध्ये निर्माण करेल अशी आशा व्यक्त केली. अशा सामाजिक सहभागामुळे रुग्णांना उपचार पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन मिळते तसेच क्षयरोगाबाबत समाजामध्ये असलेला गैरसमज व कलंक कमी करण्यासही मदत होते असे सांगितले.(The Rotary Club of Dombivli)
 
डॉ.दीपा शुक्ल यांनी रोटरी क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आणि इतर सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योग समूह तसेच नागरिकांनीही पुढे येऊन ‘निक्षय मित्र’ म्हणून क्षयरुग्णांना पोषण व इतर आवश्यक सहाय्य देण्याचे आवाहन केले.(The Rotary Club of Dombivli)
 
क्षयरोगमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी शासनाच्या प्रयत्नांना समाजाची साथ मिळणे आवश्यक आहे. रोटरी क्लबने ५० क्षयरुग्णांची पोषणाची जबाबदारी स्वीकारून या सामाजिक सहभागाचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. त्यांच्या या योगदानामुळे क्षयरुग्णांना उपचारादरम्यान आवश्यक पोषण मिळण्यासोबतच मानसिक आधार आणि आत्मविश्वास मिळण्यास निश्चितच मदत होणार आहे.(The Rotary Club of Dombivli)
 
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने रोटरी क्लबचे या उल्लेखनीय सामाजिक बांधिलकीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले . (The Rotary Club of Dombivli)
 
 




संबंधित मजकूर