नागपूर : (Rahul Gandhi V/S Devendra Fadnavis) पुण्यात येऊन महिलांच्या अधिकारांबद्दल बोलायचे आणि संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करायचा, ही राहुल गांधींची भूमिका दुटप्पीपणाची आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला.
पुण्यामध्ये शनिवारी राहुल गांधी यांनी छात्रों की गुंज कार्यक्रमात महिलांशी थेट संवाद साधला. मात्र राहुल गांधींच्या कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केली. संसदेत 33 टक्के महिला खासदारांना आरक्षण मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. तर राहुल गांधी महिला आरक्षणाला विरोध करतात.
पुण्यात येऊन महिलांच्या अधिकारांबाबत बोलायचे आणि त्यांना खरे अधिकार देणारे जे विधेयक आहे, त्याला संसदेत विरोध करायचा, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका झाली, अशी टीका त्यांनी केली. (Rahul Gandhi V/S Devendra Fadnavis)
आधी प्रियांका गांधींना काँग्रेस अध्यक्ष करा – बन
दरम्यान, राहुल गांधी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आधी प्रियांका गांधींना काँग्रेस अध्यक्ष करावे, असे आव्हान महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिले आहे. संसदेत महिलांच्या आरक्षण विधेयकाला विरोध करण्याचे काम राहुल गांधी आणि काँग्रेसने केले. तेच राहुल गांधी पुण्यातल्या 'पैसो की गुंज' कार्यक्रमात महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारत आहेत. २०१३ नंतर त्यांनी एकही महिला मुख्यमंत्री केलेली नाही, असा घणाघात बन यांनी लगावला. (Rahul Gandhi V/S Devendra Fadnavis)