मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांसाठी अतिरिक्त यंत्रसामग्री, मनुष्यबळ; सिद्धेश कदमांचे निर्देश

    23-Aug-2026
Beach Cleaning Mumbai
 
मुंबई : (Beach Cleaning Mumbai) मुंबईतील सर्व समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी उपलब्ध यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाचा सविस्तर आढावा घेऊन ज्या ठिकाणी कमतरता आहे, तिथे तातडीने अतिरिक्त यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मुंबई महापालिकेला दिले. नुकत्याच झालेल्या समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेच्या आढाव्यासाठी मुंबई महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत मुंबई शहर आणि उपनगरातील समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता तसेच विविध पर्यावरणविषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. जुहू, गोराई, वर्सोवा, दादर यांसह शहरातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवरील सध्याच्या स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. (Beach Cleaning Mumbai)
 
किनाऱ्यांवर उपलब्ध असलेल्या सफाईच्या यंत्रसामग्रीची तसेच कार्यरत मनुष्यबळाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यकतेनुसार त्यात वाढ करावी, अशा स्पष्ट सूचना कदम यांनी दिल्या. समुद्रकिनाऱ्यांची नियमित आणि प्रभावी स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेने आवश्यक ती यंत्रणा तातडीने उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. (Beach Cleaning Mumbai)
 
मुंबईतील विविध नाल्यांमधून वाहून येणारा प्लास्टिक आणि अन्य कचरा थेट समुद्रात मिसळत असल्याने तो समुद्रापर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘ओशन क्लीन अप’ या संस्थेसोबत करार केला असून, या माध्यमातून समुद्रात जाणारा कचरा रोखण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, असे कदम यांनी स्पष्ट केले. (Beach Cleaning Mumbai)
 
शहरात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वाढता वापर रोखण्यासाठी तसेच गणेशोत्सवात थर्माकोल आणि प्लास्टिकच्या फुलांवरील बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी धडक कारवाई करण्याच्या सूचनाही कदम यांनी महापालिकेला दिल्या. (Beach Cleaning Mumbai)
 
देवनार आणि कांजूरमार्ग येथील घनकचऱ्याची समस्या, घनकचरा व्यवस्थापन, शहरातील सांडपाणी व्यवस्थापन तसेच बांधकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. (Beach Cleaning Mumbai)
 
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा, उपमहापौर संजय घाडी, नगरसेवक अमेय घोले, महापालिकेचे उपायुक्त किरण दिघावकर, उपायुक्त भाग्यश्री कापसे, सहाय्यक आयुक्त, नोडल अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. (Beach Cleaning Mumbai)
 
 




संबंधित मजकूर