'मातोश्रीच्या दबावामुळेच अस्वस्थता'; महापौर रितू तावडे यांचा किशोरी पेडणेकरांना जोरदार टोला

    22-Aug-2026

Ritu Tawde vs Kishori Pednekar
 
​मुंबई : (Ritu Tawde vs Kishori Pednekar) विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्याकडून होणारे वैयक्तिक व राजकीय आरोप महापौर रितू तावडे यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. "मातोश्रीच्या राजकीय दबावामुळे अस्वस्थ झालेल्या पेडणेकर यांना स्वप्नातही मीच दिसते," असा घणाघाती टोला लगावत महापौरांनी तथ्यहीन आरोपांची हवा काढून घेतली. (Ritu Tawde vs Kishori Pednekar)
 
​'१० वर्षे पासपोर्टही नाही, मग जर्मनीचा संबंध कसा?'
 
किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या सनसनाटी आरोपांवर महापौरांनी वस्तुस्थिती समोर ठेवत रोखठोक उत्तर दिले. "मी आयुष्यात कधीही जर्मनी किंवा परभणीला गेलेली नाही. विशेष म्हणजे, गेल्या १० वर्षांत माझा पासपोर्टही बनलेला नाही. नुकताच १५ दिवसांपूर्वी पासपोर्ट नूतनीकरणासाठी अर्ज केला असून त्याचे पोलीस व्हेरिफिकेशन अद्याप बाकी आहे," असा पारदर्शक खुलासा करत महापौरांनी सत्य जनतेसमोर मांडले. (Ritu Tawde vs Kishori Pednekar)
पारदर्शक कारभारावर विरोधकांचा पोटशूळ
 
महापौर दालन आणि बंगल्याच्या मुद्द्यावर बोलताना महापौरांच्या समर्थकांनी स्पष्ट केले की, मुंबईकरांच्या सेवेसाठी आणि पालिकेच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी नियमानुसारच सर्व प्रक्रिया पार पडत आहेत. भ्रष्टाचाराचे व गैरव्यवहाराचे आरोप करून प्रशासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहे.(Ritu Tawde vs Kishori Pednekar)
 
​महापौरांच्या या रोखठोक खुलाशांमुळे विरोधकांचा बनाव उघडा पडला असून, राजकीय चिखलफेक करणाऱ्यांना महापौरांनी आपल्या कृतीतून व तथ्यांच्या आधारे सडेतोड उत्तर दिले आहे.(Ritu Tawde vs Kishori Pednekar)
 
 




संबंधित मजकूर