मुंबई : (Rahul Gandhi V/S Devendra Fadnavis) राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सीओईपीमध्ये झालेला गोंधळ हा पूर्वनियोजित असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला वातावरण मिळावे आणि कार्यक्रमाची पार्श्वभूमी तयार व्हावी, यासाठी काँग्रेसने हा प्रकार घडवून आणल्याचे फडणवीस यांनी म्हटले. कॉलेज कॅम्पसमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी हल्लाबोल करून मारामाऱ्या केल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “काल रात्रीचा गोंधळ काँग्रेसने ठरवून या कार्यक्रमाला रंगवण्यासाठी आणि कार्यक्रमाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी केलेला कार्यक्रम आहे. ज्या प्रकारे त्यांच्या नेत्यांनी कॉलेज कॅम्पसवर हल्लाबोल केला, मारामाऱ्या केल्या, ते अत्यंत दुर्दैवी आहे. या संपूर्ण प्रकारात एका विद्यार्थिनीचा काही लोकांच्या माध्यमातून दुरुपयोग करण्याचा प्रयत्न झाल्याचेही समोर आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे सीओईपीमधील प्रकार हा काँग्रेसच्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा भाग असल्याचे त्यांनी म्हटले. (Rahul Gandhi V/S Devendra Fadnavis)
‘राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट’
राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या आयोजनावरही फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केले. कार्यक्रमात सुरुवातीला गाण्यांचे कार्यक्रम होणार असून त्यानंतर राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी सुमारे सात ते आठ हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. रजिस्ट्रेशन सांगितले जात असले तरी ९० ते ९५ टक्के मुलींना काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजमधूनच प्रवेश मिळणार आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.(Rahul Gandhi V/S Devendra Fadnavis)
पैसे देऊन मुली, इन्फ्लुएन्सर्स आणल्याचा आरोप
या कार्यक्रमासाठी इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून पैसे देऊन काही मुली आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना आणले जात असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. इन्फ्लुएन्सर्सना राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाबाबत केवळ सकारात्मक मजकूर प्रसारित करण्यास सांगितले जात असल्याचेही ते म्हणाले. “राहुल गांधी आणि पार्टीबद्दल फक्त पॉझिटिव्ह टाका, निगेटिव्ह काही टाकायचे नाही, असे इन्फ्लुएन्सर्सना सांगितले जात आहे. त्यासाठी पैसे देण्याची तयारी आहे,” असा आरोप त्यांनी केला.(Rahul Gandhi V/S Devendra Fadnavis)
‘पिक्चर हिट करण्यासाठी जशी कॉन्ट्रोव्हर्सी, तशीच रणनीती’
राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी झालेल्या कथित गोंधळाची तुलना फडणवीस यांनी चित्रपटाच्या प्रमोशनशी केली. “एखादी पिक्चर रिलीज होण्यापूर्वी कॉन्ट्रोव्हर्सी उभी केली जाते आणि त्यातून पिक्चर हिट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच पद्धतीने राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी कॉन्ट्रोव्हर्सी उभी करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांनी केला,” असे ते म्हणाले.(Rahul Gandhi V/S Devendra Fadnavis)
या प्रकरणात परदेशी निधीचा वापर झाल्याचा आरोपही करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित झाला. या कार्यक्रमासाठी नऊ ते दहा कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा करण्यात आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. या आरोपांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “नवनाथ बन यांनी केलेले आरोप पुराव्याच्या आधारावरच केलेले आहेत. त्यांनी सांगितलेल्या बाबींची निश्चितपणे पडताळणी केली जाईल.” दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून दखल घेण्यात आली असून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. (Rahul Gandhi V/S Devendra Fadnavis)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.