‘पहिला मोर्चा मातोश्रीवर काढा!’मोकळ्या मैदानांच्या मुद्द्यावरून नितेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा; वाचा सविस्तर

Nitesh Rane V/S Sanjay Raut
 
मुंबई : (Nitesh Rane V/S Sanjay Raut) मुंबईतील मोकळ्या मैदानांच्या वापरावरून शिवसेना (उबाठा) आणि खासदार संजय राऊत यांच्यावर मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला. "मुंबईतील अनेक मोकळी मैदाने वर्षानुवर्षे उबाठाच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेच्या ताब्यात होती आणि त्यातील बहुसंख्य मैदानांचा वापर नाईट लाईफसाठीही करण्यात आला, असा आरोप करत “मैदानांच्या मुद्द्यावर मोर्चा काढायचा असेल तर पहिला मोर्चा मातोश्रीवर काढा,” असा टोला राणे यांनी लगावला.
 
“स्वतःच केलेल्या पापावर मोर्चा काढत असतील, तर सर्वात पहिला मोठा मोर्चा मातोश्रीवर काढा. तुम्ही केलेल्या चुका आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुधारण्याचे काम करत आहेत,” असे राणे म्हणाले.(Nitesh Rane V/S Sanjay Raut)
 
‘सहकार हा राऊतांच्या कुवतीबाहेरचा विषय’
 
खासदार संजय राऊत यांनी सहकार क्षेत्रासंदर्भात केलेल्या वक्तव्यांवरही राणे यांनी टीका केली. “संजय राजाराम राऊत आणि सहकार क्षेत्राचा काय संबंध आहे?, हे मला आजपर्यंत कळलेले नाही. शहरी सहकारी बँका, जिल्हा सहकारी बँका हा त्यांच्या कुवतीपेक्षा मोठा विषय आहे. त्यामुळे माहिती नसलेल्या विषयात त्यांनी पडू नये,” असे ते म्हणाले.(Nitesh Rane V/S Sanjay Raut)
 
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या सहकार क्षेत्रातील कामाचा दाखला देत राणे यांनी शाह यांनी घेतलेल्या निर्णयांचे कौतुक केले. सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य आणि निर्णय राऊतांच्या आकलनापेक्षा मोठे असल्याचा दावा त्यांनी केला.(Nitesh Rane V/S Sanjay Raut)
 
‘वंदे मातरम्’वरूनही ठाकरे यांच्यावर निशाणा
 
‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावरूनही राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. “जो या देशावर प्रेम करतो आणि तिरंग्याला आपला ध्वज मानतो, त्याच्या मुखातून वंदे मातरम् निघते,” असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी काँग्रेसला ‘वंदे मातरम् पूर्ण म्हणा, पहिल्या दोन ओळी म्हणू नका’ असे सांगावे, असे आव्हान राणे यांनी दिले. देशभक्तीचे प्रमाणपत्र भाजपला मागण्यापेक्षा आधी राहुल गांधींकडे देशभक्तीचे प्रमाणपत्र मागावे, अशी टीकाही त्यांनी केली.(Nitesh Rane V/S Sanjay Raut)
 
भेसळीवर कडक कारवाईचा इशारा
 
अन्नपदार्थांच्या भेसळीच्या मुद्द्यावर बोलताना राणे यांनी कडक कारवाईचे समर्थन केले. पुण्यातील पोषण आहाराच्या प्रकरणात कारवाई झाली असून, नेमकी घटना आणि चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतरच यावर भाष्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Nitesh Rane V/S Sanjay Raut)
 
दरम्यान, सिंधुदुर्गात बागबान नावाचा फळविक्रेता आणि अन्य काही फळविक्रेते केळी रासायनिक द्रव्यांमध्ये बुडवून कमी वेळेत पिकवून विकत असल्याची माहिती कानावर आली असल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्याचे सांगत “लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर निश्चितपणे कडक कारवाई होणार,” असा इशारा राणे यांनी दिला.(Nitesh Rane V/S Sanjay Raut)
 
महिला सुरक्षेवरून नाना पटोलेंना प्रत्युत्तर
 
महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर केलेल्या टीकेलाही राणे यांनी प्रत्युत्तर दिले. “दुसऱ्या पक्षातील महिला पदाधिकारी आणि नेत्यांबद्दल बोलण्यापेक्षा काँग्रेस पक्षात महिलांना किती महत्त्व आहे, याचा विचार करावा,” असा टोला त्यांनी लगावला.(Nitesh Rane V/S Sanjay Raut)
 
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज
 
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली असल्याची माहिती पालकमंत्री म्हणून राणे यांनी दिली. गणेशोत्सवासाठी मुंबई आणि महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने नागरिक, नातेवाईक आणि पर्यटक जिल्ह्यात येतात. त्यामुळे रस्ते, वीज, एसटी आणि अन्य सुविधांवर अतिरिक्त ताण येतो.(Nitesh Rane V/S Sanjay Raut)
 
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ५ ते १० सप्टेंबरपर्यंत आवश्यक कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पुढील बैठकीनंतर स्वतः जिल्ह्याच्या विविध भागांत जाऊन रस्ते आणि अन्य सुविधांची पाहणी करणार असल्याचेही राणे यांनी सांगितले.(Nitesh Rane V/S Sanjay Raut)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर