नवी मुंबई : (Navi Mumbai International Airport) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी उभारण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सिडको आणि अदानी समूहाच्या सहकार्याने उभारण्यात आलेली ही इमारत आधुनिक पायाभूत सुविधा आणि आवश्यक सोयी-सुविधांनी सुसज्ज आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळत असून, नवी मुंबई जागतिक दर्जाच्या संपर्कव्यवस्थेच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. विमानतळ परिसरात वाढणारी प्रवासी आणि नागरिकांची वर्दळ लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्वतंत्र आणि आधुनिक पोलिस ठाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.(Navi Mumbai International Airport)
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या या पोलिस ठाण्यात अधिकारी आणि अंमलदारांना कार्यक्षमतेने काम करता यावे, तसेच नागरिकांना जलद आणि सुलभ पोलिस सेवा मिळावी, यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कामकाज आणि महत्त्वपूर्ण बैठकींसाठी सुसज्ज परिषद कक्ष, तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालयीन कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.(Navi Mumbai International Airport)
एकात्मिक सीसीटीव्ही नियंत्रण केंद्राचेही उद्घाटन
याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या एकात्मिक सीसीटीव्ही नियंत्रण केंद्राचे (आयसीसीसी) उद्घाटन करण्यात आले. तसेच या केंद्राच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरणही करण्यात आले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी एकात्मिक सीसीटीव्ही नियंत्रण केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.(Navi Mumbai International Airport)
विमानतळ परिसरासह नवी मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्थेचे अधिक प्रभावी निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. या कार्यक्रमाला मंत्री गणेश नाईक, मंत्री भरत गोगावले, आमदार विक्रांत पाटील, आमदार रवींद्र फाटक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश बालदी यांच्यासह नवी मुंबई पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.(Navi Mumbai International Airport)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.