नाशिकमध्ये भव्य ’कुंभ भक्ती संगम’ सोहळ्याचे आयोजन

    22-Aug-2026   
Nashik Kumbh Bhakti Sangam
 
 नाशिक: (Nashik Kumbh Bhakti Sangam)  नाशिकच्या पावन गोदावरी तीरावर आगामी २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान भव्य ’कुंभ भक्ती संगम’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय सोहळ्यात देशभरातील नामवंत साधू-संत, महंत, कीर्तनकार आणि हजारो भाविक एकत्र येणार असून, नाशिकनगरी भक्तीरसात न्हाऊन निघणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या प्रशासकीय आणि आयोजक पातळीवर सुरू आहे.
 
कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाशिकला मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ’कुंभ भक्ती संगम’ सोहळ्याचा मुख्य उद्देश संस्कृतीचा प्रचार, आध्यात्मिक प्रबोधन आणि भक्ती मार्गाचा प्रसार करणे हा आहे. तीन दिवस चालणार्‍या या सोहळ्यात विविध धार्मिक विधी, महाआरती, संतांचे विचारमंथन, कीर्तन, प्रवचन आणि भजनांचे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. (Nashik Kumbh Bhakti Sangam)
 
२८ ऑगस्ट रोजी सकाळी भव्य शोभायात्रेने या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. या शोभायात्रेत विविध आखाड्यांचे साधू-संत आणि स्थानिक नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतील. त्यानंतर मुख्य मंडपात दीपप्रज्वलन आणि संतांच्या हस्ते सोहळ्याचे अधिकृत उद्घाटन होईल. दररोज सकाळी सामूहिक ध्यान, योगासने आणि वेदपठण केले जाईल. दुपारी देशभरातून आलेल्या प्रमुख महंतांची आध्यात्मिक प्रवचने आणि मार्गदर्शन पर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. तर संध्याकाळी गोदावरी मातेची महाआरती आणि त्यानंतर रात्री उशिरापर्यंत नामवंत कीर्तनकार व गायकांच्या सुश्राव्य भजनांचे कार्यक्रम रंगणार आहेत.साधू-संतांची उपस्थिती आणि विचारमंथनया कुंभ भक्ती संगमात देशभरातील प्रमुख पीठांचे शंकराचार्य, विविध आखाड्यांचे महामंडलेश्वर आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अग्रगण्य संत उपस्थित राहणार आहेत. (Nashik Kumbh Bhakti Sangam)
 
प्रशासनाकडून चोख व्यवस्था
 
आगामी सोहळ्याची भव्यता लक्षात घेता नाशिक महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने चोख तयारी सुरू केली आहे. तीन दिवसांत नाशिक आणि बाहेरील जिल्ह्यांतून लाखो भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून वाहतूक व्यवस्थेत आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, आरोग्य पथके आणि तात्पुरत्या निवासस्थानांची व्यवस्था करण्यात आली आहे. गोदावरीच्या घाटांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले जाणार आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जीवरक्षक आणि अग्निशामक दलाची पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. (Nashik Kumbh Bhakti Sangam)
 
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर