युवाशक्तीच्या साथीने नशामुक्त नवी मुंबईचा संकल्प!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॅम्पस कनेक्ट’ अभियानाचा शुभारंभ

प्रत्येक विद्यार्थी नशाविरोधी मोहिमेचा सैनिक; ‘६५ टक्के युवाशक्ती ही भारताची ताकद’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


Drug Free Navi Mumbai
 
नवी मुंबई : (Drug Free Navi Mumbai) अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यापासून तरुणाईला दूर ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानांतर्गत ‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.(Drug Free Navi Mumbai)
 
आजच्या तरुण पिढीत अमली पदार्थांचे वाढते आकर्षण आणि त्याचे होणारे सामाजिक, शारीरिक व मानसिक दुष्परिणाम गंभीर आहेत. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी विद्यार्थ्यांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रम हाती घेतला आहे. महाविद्यालयीन जीवन हा युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा महत्त्वाचा टप्पा असल्याने याच काळात अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत योग्य माहिती आणि जागरूकता निर्माण करण्यावर या अभियानात भर देण्यात येणार आहे.(Drug Free Navi Mumbai)
 
भारताच्या लोकसंख्यात्मक लाभांशाचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशाची सुमारे ६५ टक्के युवाशक्ती ही भारताची मोठी ताकद आहे. या शक्तीला कमकुवत करण्यासाठी शत्रूराष्ट्रे आणि समाजविघातक घटक तरुणांना व्यसनांच्या आहारी लावण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे अमली पदार्थांची पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्याबरोबरच त्यांची मागणी कमी करण्यासाठी तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक आहे.(Drug Free Navi Mumbai)
 
स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा दाखला देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी योग्य दिशेने वाटचाल करणारी युवाशक्ती समाजासाठी प्रेरणादायी ठरते, असे सांगितले. प्रत्येक शैक्षणिक कॅम्पस हे नशाविरोधी लढ्याचे केंद्र आणि प्रत्येक विद्यार्थी या मोहिमेचा सैनिक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा आणि कौशल्यविकासाला प्राधान्य द्यावे. व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना दोष न देता त्यांना व्यसनमुक्ती केंद्रांच्या माध्यमातून आवश्यक मदत आणि पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.(Drug Free Navi Mumbai)
 
नवी मुंबई पोलिस, महानगरपालिका, नागरिक आणि तरुणाई यांच्या संयुक्त प्रयत्नांतून नवी मुंबई पूर्णपणे नशामुक्त आणि सुरक्षित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तरुणाईच्या सक्रिय सहभागातून सुजलाम-सुफलाम आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.(Drug Free Navi Mumbai)
 
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्राचे आणि व्यसनमुक्ती जनजागृतीपर चित्रफितीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच अभियानांतर्गत आयोजित जनजागृतीपर पोस्टर आणि रील्स स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला मंत्री गणेश नाईक, मंत्री भरत गोगावले, आमदार विक्रांत पाटील, आमदार रवींद्र फाटक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश बालदी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.(Drug Free Navi Mumbai)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर