१ सप्टेंबरपासून रिक्षा-टॅक्सी महाग; जाणून घ्या नवे किमान भाडे

Rickshaw Taxi Fare Hike
 
मुंबई : (Rickshaw Taxi Fare Hike) मुंबईसह एमएमआर परिसरात दि. १ सप्टेंबर २०२६ पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. रिक्षासाठी किमान दीड किलोमीटरसाठी दर १ रुपयाने तर टॅक्सीची भाडेवाढ ही २ रुपयांनी करण्यात आली आहे. (Rickshaw Taxi Fare Hike)
 
नव्या दरानुसार, रिक्षाच्या किमान भाड्यात १ रुपयांची, तर टॅक्सीच्या किमान भाड्यात २ रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता रिक्षासाठी किमान दीड किलोमीटरच्या प्रवासासाठी २७ रुपये, तर टॅक्सीसाठी ३३ रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या रिक्षाचे किमान भाडे २६ रुपये, तर टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपये आहे. (Rickshaw Taxi Fare Hike)
 
इंधन आणि देखभाल खर्चाचा परिणाम
 
गेल्या काही वर्षांत इंधनाच्या किमती, वाहनांची देखभाल, सुटे भाग आणि इतर परिचालन खर्चात वाढ झाली आहे. वाढत्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्नावर परिणाम होत असल्याने रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून भाडेवाढीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार परिवहन आयुक्तांनी दि. २० ऑगस्ट रोजी भाडेवाढीचा प्रस्ताव एमएमआरटीएकडे पाठवला होता. (Rickshaw Taxi Fare Hike)
 
मुंबईसह या भागांत नवे दर
 
एमएमआरटीएच्या मंजुरीनंतर ही भाडेवाढ मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई, विरार आणि पालघर या एमएमआरमधील प्रमुख भागांत लागू होणार आहे. मात्र, वाढत्या इंधन आणि वाहन देखभाल खर्चाच्या पार्श्वभूमीवर चालकांसाठी ही दरवाढ दिलासा देणारी ठरणार आहे. मात्र सर्वसामान्यांच्या खिशावर या भाडेवाढीचा ताण पडणार आहे. (Rickshaw Taxi Fare Hike)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर