ठाणे : (Mega Block)दिवा रेल्वे स्थानकावर कल्याण दिशेकडील नवीन पादचारी पूलाच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेकडून सलग तीन रात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही उपनगरीय लोकल सेवांच्या मार्गात आणि थांब्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.
दिवा स्थानकावरील कल्याण दिशेकडील पादचारी पूलाच्या कामासाठी २१/२२, २२/२३ आणि २३/२४ ऑगस्ट या तीन रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दररोज रात्री १.२० ते ३.२० वाजेपर्यंत म्हणजेच दोन तासांचा असेल. (Mega Block)
या कालावधीत कलवा ते डोंबिवली दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या ब्लॉकमुळे उपनगरीय रेल्वे सेवांमध्येही बदल करण्यात आला आहे. (Mega Block)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रात्री १२.०८ वाजता कसाऱ्याकडे जाणारी लोकल आणि रात्री १२.१२ वाजता कर्जतकडे जाणारी लोकल ठाणे ते कल्याणदरम्यान जलद मार्गावरून वळविण्यात येणार आहे. (Mega Block)
त्यामुळे या दोन्ही लोकल ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. (Mega Block)