फॉलोअर्स बघून कास्टिंग केलं जातं तेव्हा वाईट वाटतं!

    22-Aug-2026
 
 
manasi
 
 
 
 
मुंबई - (manasi kulkarni )'द्विधा' चित्रपटात मानसी कुळकर्णी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे, शिवाय ति या चित्रपटाची सहनिर्माती पण आहे.. मानसीने यावेळी मुबई तरुण भारतशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात. फॉलोअर्स बघून कास्टिंग केलं जातं तेव्हा वाईट वाटतं!, बऱ्याचदा असे अनुभव आल्याचं तिने सांगितलं. शिवाय मालिकेतील कलाकार आणि सिनेमातील कलाकार असा हि भेदभाव केला जातो तेव्हा या गोष्टी अनाकलनीय असल्याचं तिने सांगितलं.
 
 
मानसी यावेळी म्हणाली कि ,दूरचित्रवाणी तुमच्यासाठी सुरक्षित माध्यम आहे. कारण तुम्हाला जास्त आणि नियमित मानधन इथे मिळतं. आता माझे बरेच चित्रपट रेडी आहेत पण अजून प्रदर्शित झालेले नाही. मी एक अभिनेत्री म्हणून रिस्क घ्यायला आता तयार आहे. एका प्रायोगिक साच्यातून बाहेर निघून वेगवेगळे प्रयोग मला आता करायचे आहेत. माझ्या स्वतःच्या दोन-तीन फिल्म्स रेडी आहेत पण अजून त्याचा रिलीजचा पत्ता नाहीये. बरं मला जास्त चित्रपटांच्या ऑफर्स नाही येत. कदाचित दूरचित्रवाणी कलाकार आणि चित्रपटातील कलाकार असा भेदभाव होत असल्यामुळे असं होत असेल. कास्टिंग होत असताना मी स्वतः हे बघितलंय. जेव्हा मी चित्रपट करत होते तेव्हा मी काही कास्टिंगसाठी काही नाव सुचविली होती. पण ते फक्त दूरचित्रवाणीवर काम करतात म्हणून त्यांना त्या प्रोजेक्टमधून बाहेर करण्यात आलं. मला तेव्हा खूप वाईट वाटलं. अरे आमचं काम बघा मग ठरवा ना. मी नाटक करते, एकदा नाटक बघायला या , माझं काम बघा , मग माझी क्षमता ओळख हे माझं सगळ्यांना सांगणं आहे, असं मानसी यावेळी म्हणाली. (manasi kulkarni )
 
 
एवढं कमी होतं कि काय आता अजून एक डोक्याला ताप झालाय. तुमचे फॉलोअर्स बघून तुह्माला काम मिळणार कि नाही हे ठरवलं जात. आता माझ्या फॉलोअर्सवरून तुम्ही आमची अभिनय क्षमता नाही ठरवू शकत. एखाद्या माणसाने मला फॉलो केलं किंवा लाईक केलं ह्याचा अर्थ असा नाही होत की तो माणूस उद्या घरातून बाहेर पडून 250 रुपयाचे तिकीट काढून माझा चित्रपट बघायला येईल. बऱ्याच कलाकारांनी वर्षभरात या गोष्टीवर वारंवार बोलण्याचा प्रयत्न केलाय. बऱ्याच चांगल्या कलाकारांचा फॉलोअर्सच्या गोष्टीमुळे रोल गेलाय. माझ्या बाबतीत पण हे घडलंय. एका मोठ्या बॅनरच्या मोठ्या चित्रपटासाठी मी ऑडिशन दिलं होतं. माझी निवड पण होणार होती पण फॉलोअर्सचा विषय निघाला आणि चित्रपट माझ्या हातातून गेला. याचं मला खूप वाईट वाटलं, असं शल्यही यावेळी मानसीने बोलून दाखवलं. (manasi kulkarni )
 




संबंधित मजकूर