महाराष्ट्राच्या तरुणाईला ‘टाटा स्ट्राइव्ह’चा स्किल बूस्टर! रोजगाराभिमुख प्रशिक्षणाचा राज्यभर विस्तार; वाचा सविस्तर

२७० आयटीआयमध्ये ‘ड्युअल व्हीईटी’, डिजिटल कौशल्यांवरही भर

 
Job Oriented Training Skill Development Program
 
मुंबई : (Job Oriented Training Skill Development Program) महाराष्ट्रातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासोबतच उद्योजकता, डिजिटल कौशल्ये आणि नावीन्यपूर्ण क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘टाटा स्ट्राइव्ह’सोबतचे सहकार्य अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हकडून राज्यात २०१५ पासून विविध कौशल्य विकास उपक्रम राबविले जात आहेत. या माध्यमातून आतापर्यंत हजारो युवकांना उद्योगाच्या गरजांनुसार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
 
रोजगाराच्या संधी वाढण्यावर भर
 
“टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल्य, रोजगारक्षमता, उद्योजकता आणि नावीन्यता विकासाला मोठी चालना मिळत आहे. या उपक्रमामुळे रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.(Job Oriented Training Skill Development Program)
 
रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण
 
नागपूर येथील टाटा स्ट्राइव्हच्या नव्या कौशल्य विकास केंद्राचे २६ जुलै रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक येथील मोठ्या केंद्रांमधून आतापर्यंत ८ हजारांहून अधिक युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय विविध विस्तार व भागीदार केंद्रांच्या माध्यमातून आणखी ६ हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण मिळाले आहे.(Job Oriented Training Skill Development Program)
 
उद्योगांच्या गरजेनुसार विशेष प्रशिक्षण
 
ठाणे येथे वातानुकूलन क्षेत्रासाठी, तर पुणे आणि भिलवडी येथे ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी विशेष प्रशिक्षण सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. तळोजा आणि नागपूर येथे बहुकौशल्य प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहेत. त्यामुळे पारंपरिक कौशल्य प्रशिक्षणासोबतच उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार युवकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यावर भर दिला जात आहे.(Job Oriented Training Skill Development Program)
 
२७० आयटीआयमध्ये ‘ड्युअल व्हीईटी’
 
टाटा स्ट्राइव्हने सिमेन्सच्या भागीदारीत राज्यातील २७० शासकीय आयटीआयमध्ये ‘ड्युअल व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग’ (ड्युअल व्हीईटी) कार्यक्रम राबविला आहे. या उपक्रमातून ६०० हून अधिक प्रशिक्षकांना अध्यापनशास्त्रीय प्रशिक्षण, तर ३५ हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थींना उद्योग व प्रकल्पांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला आहे. आयटीआयच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षात विद्यार्थ्यांना ऑन-द-जॉब ट्रेनिंगची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.(Job Oriented Training Skill Development Program)
 
३,५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
 
बजाज ऑटोच्या सहकार्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११ शासकीय आणि ७ खासगी अशा १८ आयटीआयमध्ये टोटल प्रॉडक्टिव्ह मेंटेनन्सवर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविला जात आहे. ‘बजाज ऑनलाईन लर्निंग अँड डिस्कव्हरी’ या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिमवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी ३,५०० हून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.(Job Oriented Training Skill Development Program)
 
डिजिटल कौशल्यांपासून उद्योजकतेपर्यंत
 
टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रात १,८०० हून अधिक व्यक्तींना उद्योजकतेचे प्रशिक्षण दिले असून, व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले आहे. सह्याद्री फार्म्स, टाटा कॅपिटल, टाटा कम्युनिकेशन, सिडबी, ओरिजनल कॉम्पोसिट कंपनी आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांचे या उपक्रमाला सहकार्य मिळाले आहे.
 
मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि ॲमेझॉनच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या डिजिटल कौशल्य कार्यक्रमांतून ४ हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थींना सायबर सिक्युरिटी, आयटी सिस्टिम्स, डिजिटल मार्केटिंग, यूएक्स डिझाइन आणि क्लाऊड कम्प्युटिंगचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.(Job Oriented Training Skill Development Program)
 
पिंपरी-चिंचवडमध्ये ५ हजार बचतगटांचे सक्षमीकरण
 
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसोबत ‘प्रोजेक्ट सक्षमा’ अंतर्गत २०२३ पासून बचतगटांच्या सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. तीन वर्षांत ५ हजार सक्रिय बचतगटांना प्रशिक्षण, तांत्रिक सहाय्य, उपजीविकेची मॉडेल्स आणि बाजारपेठेशी जोडणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. डिसेंबर २०२३ पासून सुमारे १० हजार बचतगटांचे आधारभूत सर्वेक्षण करण्यात आले आहे.(Job Oriented Training Skill Development Program)
 
महाविद्यालयांमध्येही उद्योगाभिमुख अभ्यासक्रम
 
महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये उद्योगाच्या गरजांशी सुसंगत कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी टाटा स्ट्राइव्हने सहकार्याची तयारी दर्शविली आहे. अनुभवी प्रशिक्षक आणि उद्योगतज्ज्ञांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासोबतच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.(Job Oriented Training Skill Development Program)
 
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी सांगितले की, आयटीआय विद्यार्थ्यांचे ऑन-द-जॉब ट्रेनिंग आणि प्लेसमेंट वाढविण्यासाठी टाटा स्ट्राइव्ह, सिमेन्स आणि बजाज यांच्या सहकार्याने ड्युअल व्होकेशनल एज्युकेशन सिस्टिम राबविली जात आहे. भविष्यातही तरुणांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्यासाठी टाटा स्ट्राइव्हसोबतचे सहकार्य आणखी पुढे नेण्यात येईल.(Job Oriented Training Skill Development Program)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर