महाराष्ट्र-हेसन भागीदारीला नवी दिशा; महाराष्ट्र हेसनसाठी भारत आणि इंडो-पॅसिफिकचे प्रवेशद्वार

Maharashtra Hessen Partnership
 
मुंबई : (Maharashtra Hessen Partnership) महाराष्ट्र आणि जर्मनीतील हेसन राज्यादरम्यान झालेल्या सामंजस्य करारामुळे गुंतवणूक, नवोन्मेष, रोजगार आणि कौशल्य विकासाला नवी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र हे हेसनसाठी भारत आणि इंडो-पॅसिफिकचे प्रवेशद्वार, तर हेसन हे महाराष्ट्रासाठी जर्मनी आणि युरोपचे प्रवेशद्वार ठरेल, असेही त्यांनी सांगितले.(Maharashtra Hessen Partnership)
 
सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हेसनचे अध्यक्ष बोरीस ऱ्हेइन यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. उद्योग, सेवा, माहिती तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि सीमापार गतिशीलता ही सहकार्याची प्रमुख क्षेत्रे असतील.(Maharashtra Hessen Partnership)
 
औषधनिर्मिती, आरोग्यसेवा, अभियांत्रिकी, वाहन उद्योग, वित्तीय सेवा, लॉजिस्टिक्स, डिजिटल अर्थव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रांत सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हेसनमधील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, तर महाराष्ट्रातील उद्योगांनी जर्मनी व युरोपीय बाजारपेठेत प्रवेशासाठी हेसनचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.(Maharashtra Hessen Partnership)
 
महाराष्ट्रातील युवा मनुष्यबळ आणि जर्मनीतील कुशल कामगारांची वाढती गरज लक्षात घेता कौशल्य विकास व रोजगारनिर्मितीसाठी संयुक्त प्रयत्न करण्यावरही भर देण्यात आला. नवी मुंबईजवळील एज्युकेशन सिटीमध्ये हेसनमधील विद्यापीठांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. कराराच्या अंमलबजावणीसाठी संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार असून मुंबई आणि हेसन येथे नियमित ‘महाराष्ट्र-हेसन बिझनेस डायलॉग’ आयोजित करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला.(Maharashtra Hessen Partnership)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर