अनेक मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्याचा फटका 'घबाडकुंड'ला बसला !

    22-Aug-2026
 
pritam
 
 
 
 
मुंबई - (Ghabad Kund )प्रीतम पाटील दिग्दर्शित 'घबाड कुंड' चित्रपटाने बॉक्स ऑफिसावर चांगला व्यवसाय केला. हॉरर कॉमेडी पठडीतल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचं पुरेपुर मनोरंजन केलं. पण तरीही 'घबाड कुंड' प्रदर्शित झाला त्याच्या आसपास अनेक मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्याचा फटका या चित्रपटाला बसल्याची खंत दिग्दर्शक प्रीतम पाटील यांनी मुंबई तरुण भारतशी संवाद साधताना व्यक्त केली.
 
अनेक मोठे चित्रपट आसपास प्रदर्शित झाल्याचा नक्कीच फटका 'घबाड कुंड'ला बसला. एका पाठोपाठ अनेक हिंदी चित्रपट यादरम्यान प्रदर्शित झालेत. 'मे वापस आऊंगा', 'वेलकम 3', 'अल्फा', 'धमाल 4' या हिन्दी सिनेमांसोबतच आपले 'देऊळ बंद 2' आणि 'तुंबाडची मंजुळा' पण जोरात सुरु होते. यात पण हिंदी सिनेमाला प्राधान्य जास्त मिळाल्यामुळे थोडा फरक पडला. मला वाटतं महाराष्ट्रात मराठी सिनेमाला प्राधान्य मिळायला हवं. चित्रपट चांगला असेल तर त्याला तो मान मिळायलाच हवा. हि आपली अनेक वर्षांपासूनची ओरड आहे. यावर आता सगळ्यांनी एकत्र येऊन तोडगा काढणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन यावेळी प्रीतम पाटील यांनी केलं.  (Ghabad Kund )
 
तसेच बऱ्याचदा चांगले चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यामुळे निर्मात्यांना फटका बसतो. स्क्रीन विभागतात, प्रेक्षकांसमोर पण कुठला सिनेमा बघायचा हा प्रश्न पडतो. व्यवस्थित कुठल्याच सिनेमाला हवा तसा प्रेक्षक मिळत नाही. आता मध्यंतरी आपण बघितलं गेल्या तीन चार महिन्यात तर अनेक असे दिवस आहेत ज्यात दोन-तीन चांगले सिनेमे एकत्र रिलीज झालेत. आधी आपल्यातली स्पर्धा टाळणं गरजेचं आहे, तर आपण इतर भाषेतील सिनेमांना थांबवू शकतो. आपल्यामध्ये आपसात संवाद झाला तरच ह्या गोष्टी टाळता येऊ शकतात. माझा तुझा सिनेमा करत बसण्यापेक्षा आपला सिनेमा म्हणून बघण्याचा दृष्टिकोन झाला तर आपल्यालाही फायदा होईल असे परखड मत हि यावेळी पाटील यांनी व्यक्त केलं.  (Ghabad Kund )
 
संदिप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने मराठी बॉक्स ऑफिसवर १० कॊटीपेंक्षा जास्त्त व्यवसाय केला .  (Ghabad Kund )
 
 




संबंधित मजकूर