शिलास्मारकाचे शिल्पकार : ‘समन्वय ऋषी’ एकनाथ रानडे

    22-Aug-2026
Eknath Ranade Vivekananda Rock Memorial
 
कन्याकुमारीतील स्वामी विवेकानंदांचे स्मारक आज अनेक पर्यटकांच्या भेटीसाठीचे आजमितीचे महत्त्वाचे स्थान. मात्र, त्या श्रीपाद शिलेवर हे स्मारक उभारणीच्या इतिहासात एक नाव जोडले गेले ते म्हणजे या शिलास्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचे. आज दि. २२ ऑगस्ट रोजी एकनाथ रानडे यांच्या पुण्यथितीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचे स्मरण करणारा हा लेख...
 
भारतमातेच्या चरणी, तीनही समुद्रांच्या संगमस्थानी असलेल्या ‘श्रीपाद शिले’वर मला माझ्या जीवनाची कार्ययोजना प्राप्त झाली. - स्वामी विवेकानंद
 
‘परिव्राजक’ अवस्थेत संपूर्ण भारताचे भ्रमण केल्यानंतर, स्वामी विवेकानंद कन्याकुमारी येथे आले. तेथे माँ कन्याकुमारीच्या तपश्चर्येने पावन झालेल्या आणि त्यांच्या पदचिन्हांनी अंकित असलेल्या ‘श्रीपाद शिले’वर त्यांनी, सलग तीन दिवस-तीन रात्री ध्यानधारणा केली. ज्याप्रमाणे माता पार्वतींना कन्याकुमारी अवतारात त्या शिलेवर आपल्या जीवनाचे ध्येय प्राप्त झाले, त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांनाही आपल्या आगामी जीवनाची कार्ययोजना याच ठिकाणी स्पष्ट झाली. स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीच्या पूर्वतयारीच्या काळात, या शिलेवर स्वामीजींची मूर्ती उभारण्याचा संकल्प स्थानिक प्रबुद्ध नागरिकांच्या मनात आला. मात्र, लवकरच हा विषय वादग्रस्त ठरला. स्थानिक मच्छीमारांपैकी काहींना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी हाताशी धरून, या उपक्रमाला तीव्र विरोध सुरू केला. काही समाजद्रोही प्रवृत्तीच्या लोकांनी या शिलेचा संबंध ‘सेंट थॉमस’शी जोडत, तेथे क्रॉस उभारण्याचाही प्रयत्न केला. अशा परिस्थितीत हे कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरकार्यवाह एकनाथ रानडे यांच्यावर सोपविण्यात आली.
 
एकनाथजींचा स्वभावच समन्वय साधण्याचा. मध्य भारतात प्रचारक म्हणून कार्य करतानाही, समाजातील सर्व स्तरांतील लोकांशी त्यांचा घनिष्ठ संपर्क होता. जबलपूर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी एखादा बाहेरगावचा अधिकारी कार्यालयात आला असता, एकनाथजी अधिवेशनस्थळीच जाऊन त्यांच्याशी संपर्क साधत असल्याचे त्याला समजत असे. कोलकाता (तत्कालीन कलकत्ता) येथे पूर्व क्षेत्राचे कार्य करताना, त्यांचा एका बाजूला ‘रामकृष्ण मिशन’च्या संन्याशांशी घनिष्ठ परिचय होता; तर दुसर्‍या बाजूला ज्योती बसू यांच्यासह अनेक डाव्या विचारसरणीच्या नेत्यांशीही त्यांचे आत्मीय संबंध होते. आसाममध्येही समाजातील सर्व स्तरांतील लोकांबरोबरच, स्वतःला संघाचे विरोधक म्हणवून घेणार्‍या प्रभावशाली व्यक्तींशीही सहज संबंध प्रस्थापित करणे, संवाद साधणे आणि सहकार्य मिळवणे, याचा एकनाथजींना मोठा अनुभव होता.
 
संघावर पहिली बंदी आली त्याकाळात संघटनेची राज्यघटना तयार करण्याच्या प्रक्रियेत पूजनीय गुरुजी, चेन्नईतील विधिज्ञ आणि केंद्र सरकार; विशेषतः तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचे कामही एकनाथजींनी सहजपणे पार पाडले. एकनाथजींसोबत काही प्रसंगी सरदार पटेल यांची भेट घेण्यासाठी गेलेले कार्यकर्ते सुजित धर यांनी, एका घटनेचा उल्लेख केला आहे. एकनाथजींच्या व्यक्तिमत्त्वाने गृहमंत्री सरदार पटेल इतके प्रभावित झाले होते की, ते आपल्या सहकार्‍याला म्हणाले की; "लोक मला ‘लोहपुरुष’ म्हणतात; पण हे तर प्रत्यक्ष पोलादच आहेत.” वैचारिक मतभेद असतानाही, आपल्या आचरणातून समोरच्याला आपलेसे करून घेणे, हे एकनाथजींच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य. विचारांच्या पातळीवर कोणतीही तडजोड न करता, सर्वमान्य सहमती निर्माण करण्याची त्यांची कुशलता, हाच पोलादी गुण सरदार पटेल यांच्या दृष्टीने त्यांना ‘फौलाद’ ठरवत होता.
 
शिलास्मारकाच्या उभारणीची संपूर्ण गाथाच एकनाथजींच्या समन्वयकौशल्याची कथा आहे. शिलेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्याची परवानगी मिळवताना सर्वांत पहिला अडथळा होते, ते तत्कालीन केंद्रीय संस्कृतीमंत्री हुमायून कबीर. त्यांचा लोकसभा मतदारसंघ कोलकाता येथेच होता. एकनाथजींनी तेथे पत्रकार परिषद घेऊन असे वातावरण निर्माण केले की, बंगालचे सुपुत्र स्वामी विवेकानंद यांचे स्मारक तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे उभारले जात असून, त्याच्या परवानगीची किल्ली तुमच्या खासदाराच्या हातात आहे.
 
या प्रश्नाच्या समाधानासाठी एकनाथजींनी कोणाला दोष देण्याऐवजी, जबाबदारीची जाणीव करून देण्याची रणनीती स्वीकारली. या बातमीला पुरेसा प्रसार मिळाल्यानंतर त्यांनी संस्कृतीमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर मंत्र्यांना या प्रस्तावाबाबत कोणतीही हरकत राहिली नाही. मात्र, आता केवळ तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची संमती आवश्यक होती. नागपूरचे खासदार बापूजी अणे यांच्या सहकार्याने आणि लालबहादूर शास्त्री यांच्या माध्यमातून, नेहरूंपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले. शास्त्रीजींनी सुचवले की, काही खासदारांचे निवेदन मिळाले, तर लोकशाहीमार्गाने निर्माण होणारा दबाव पंतप्रधानांना निर्णय घेण्यास प्रवृत्त करू शकतो. त्यांच्या मनात १०-२० खासदारांच्या स्वाक्षर्‍या घेण्याचा विचार होता.
 
एकनाथजींनी निवेदन तयार करून, संसद परिसरात सर्व पक्षांतील प्रभावी नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली. त्यांचे संवादकौशल्य असे होते की, परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या तब्बल ३२३ खासदारांनी, कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभारण्याच्या मागणीच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या केल्या. त्यावेळी जनसंघाचे लोकसभेत केवळ चार खासदार होते. काँग्रेस, स्वतंत्र पक्ष, समाजवादी पक्ष यांच्यासोबतच साम्यवादी पक्षांच्या खासदारांनीही, या निवेदनावर स्वाक्षर्‍या केल्या. युद्धाचा प्रसंग वगळता, एखाद्या एकाच विषयावर इतया विविध राजकीय पक्षांमध्ये निर्माण झालेली अशी बहुपक्षीय एकमताची घटना, अत्यंत दुर्मीळच म्हणावी लागेल. एकनाथजींचा व्यापक जनसंपर्क आणि निर्मळ संवादशैली, यामागील प्रमुख कारण होते. कन्याकुमारीतील विवेकानंदपुरम् येथील ‘गंगोत्री’ प्रदर्शनात, हे निवेदन सर्व खासदारांच्या स्वाक्षर्‍यांसह आजही पाहता येते.
शास्त्रीजींनी या स्वाक्षर्‍यांची अनेक वेळा बारकाईने पाहणी केली. त्या अस्सल असल्याची खात्री झाल्यानंतर तेही आश्चर्यचकित झाले. त्यांनी एकनाथजींना सांगितले, ‘आता नेहरूजींना राजी करणे हे माझे काम.’ एवढ्या मोठ्या संख्येने खासदारांचे समर्थन पाहून पंतप्रधान नेहरूंनी लोकसभेतच घोषणा केली की, कन्याकुमारीच्या विवेकानंद शिलेवर स्वामीजींचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. या निर्णभारतमातेच्या चरणी, तीनही समुद्रांच्या संगमस्थानी असलेल्या ‘श्रीपाद शिले’वर मला माझ्या जीवनाची कार्ययोजना प्राप्त झाली. - स्वामी विवेकानंद
 
‘परिव्राजक’ अवस्थेत संपूर्ण भारताचे भ्रमण केल्यानंतर, स्वामी विवेकानंद कन्याकुमारी येथे आले. तेथे माँ कन्याकुमारीच्या तपश्चर्येने पावन झालेल्या आणि त्यांच्या पदचिन्हांनी अंकित असलेल्या ‘श्रीपाद शिले’वर त्यांनी, सलग तीन दिवस-तीन रात्री ध्यानधारणा केली. ज्याप्रमाणे माता पार्वतींना कन्याकुमारी अवतारात त्या शिलेवर आपल्या जीवनाचे ध्येय प्राप्त झाले, त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांनाही आपल्या आगामी जीवनाची कार्ययोजना याच ठिकाणी स्पष्ट झाली. स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीच्या पूर्वतयारीच्या काळात, या शिलेवर स्वामीजींची मूर्ती उभारण्याचा संकल्प स्थानिक प्रबुद्ध नागरिकांच्या मनात आला. मात्र, लवकरच हा विषय वादग्रस्त ठरला. स्थानिक मच्छीमारांपैकी काहींना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी हाताशी धरून, या उपक्रमाला तीव्र विरोध सुरू केला. काही समाजद्रोही प्रवृत्तीच्या लोकांनी या शिलेचा संबंध ‘सेंट थॉमस’शी जोडत, तेथे क्रॉस उभारण्याचाही प्रयत्न केला. अशा परिस्थितीत हे कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरकार्यवाह एकनाथ रानडे यांच्यावर सोपविण्यात आली.
 
एकनाथजींचा स्वभावच समन्वय साधण्याचा. मध्य भारतात प्रचारक म्हणून कार्य करतानाही, समाजातील सर्व स्तरांतील लोकांशी त्यांचा घनिष्ठ संपर्क होता. जबलपूर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी एखादा बाहेरगावचा अधिकारी कार्यालयात आला असता, एकनाथजी अधिवेशनस्थळीच जाऊन त्यांच्याशी संपर्क साधत असल्याचे त्याला समजत असे. कोलकाता (तत्कालीन कलकत्ता) येथे पूर्व क्षेत्राचे कार्य करताना, त्यांचा एका बाजूला ‘रामकृष्ण मिशन’च्या संन्याशांशी घनिष्ठ परिचय होता; तर दुसर्‍या बाजूला ज्योती बसू यांच्यासह अनेक डाव्या विचारसरणीच्या नेत्यांशीही त्यांचे आत्मीय संबंध होते. आसाममध्येही समाजातील सर्व स्तरांतील लोकांबरोबरच, स्वतःला संघाचे विरोधक म्हणवून घेणार्‍या प्रभावशाली व्यक्तींशीही सहज संबंध प्रस्थापित करणे, संवाद साधणे आणि सहकार्य मिळवणे, याचा एकनाथजींना मोठा अनुभव होता.
 
संघावर पहिली बंदी आली त्याकाळात संघटनेची राज्यघटना तयार करण्याच्या प्रक्रियेत पूजनीय गुरुजी, चेन्नईतील विधिज्ञ आणि केंद्र सरकार; विशेषतः तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचे कामही एकनाथजींनी सहजपणे पार पाडले. एकनाथजींसोबत काही प्रसंगी सरदार पटेल यांची भेट घेण्यासाठी गेलेले कार्यकर्ते सुजित धर यांनी, एका घटनेचा उल्लेख केला आहे. एकनाथजींच्या व्यक्तिमत्त्वाने गृहमंत्री सरदार पटेल इतके प्रभावित झाले होते की, ते आपल्या सहकार्‍याला म्हणाले की; "लोक मला ‘लोहपुरुष’ म्हणतात; पण हे तर प्रत्यक्ष पोलादच आहेत.” वैचारिक मतभेद असतानाही, आपल्या आचरणातून समोरच्याला आपलेसे करून घेणे, हे एकनाथजींच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य. विचारांच्या पातळीवर कोणतीही तडजोड न करता, सर्वमान्य सहमती निर्माण करण्याची त्यांची कुशलता, हाच पोलादी गुण सरदार पटेल यांच्या दृष्टीने त्यांना ‘फौलाद’ ठरवत होता.
 
शिलास्मारकाच्या उभारणीची संपूर्ण गाथाच एकनाथजींच्या समन्वयकौशल्याची कथा आहे. शिलेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्याची परवानगी मिळवताना सर्वांत पहिला अडथळा होते, ते तत्कालीन केंद्रीय संस्कृतीमंत्री हुमायून कबीर. त्यांचा लोकसभा मतदारसंघ कोलकाता येथेच होता. एकनाथजींनी तेथे पत्रकार परिषद घेऊन असे वातावरण निर्माण केले की, बंगालचे सुपुत्र स्वामी विवेकानंद यांचे स्मारक तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे उभारले जात असून, त्याच्या परवानगीची किल्ली तुमच्या खासदाराच्या हातात आहे.
 
या प्रश्नाच्या समाधानासाठी एकनाथजींनी कोणाला दोष देण्याऐवजी, जबाबदारीची जाणीव करून देण्याची रणनीती स्वीकारली. या बातमीला पुरेसा प्रसार मिळाल्यानंतर त्यांनी संस्कृतीमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर मंत्र्यांना या प्रस्तावाबाबत कोणतीही हरकत राहिली नाही. मात्र, आता केवळ तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची संमती आवश्यक होती. नागपूरचे खासदार बापूजी अणे यांच्या सहकार्याने आणि लालबहादूर शास्त्री यांच्या माध्यमातून, नेहरूंपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले. शास्त्रीजींनी सुचवले की, काही खासदारांचे निवेदन मिळाले, तर लोकशाहीमार्गाने निर्माण होणारा दबाव पंतप्रधानांना निर्णय घेण्यास प्रवृत्त करू शकतो. त्यांच्या मनात १०-२० खासदारांच्या स्वाक्षर्‍या घेण्याचा विचार होता.
 
एकनाथजींनी निवेदन तयार करून, संसद परिसरात सर्व पक्षांतील प्रभावी नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली. त्यांचे संवादकौशल्य असे होते की, परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या तब्बल ३२३ खासदारांनी, कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभारण्याच्या मागणीच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या केल्या. त्यावेळी जनसंघाचे लोकसभेत केवळ चार खासदार होते. काँग्रेस, स्वतंत्र पक्ष, समाजवादी पक्ष यांच्यासोबतच साम्यवादी पक्षांच्या खासदारांनीही, या निवेदनावर स्वाक्षर्‍या केल्या. युद्धाचा प्रसंग वगळता, एखाद्या एकाच विषयावर इतया विविध राजकीय पक्षांमध्ये निर्माण झालेली अशी बहुपक्षीय एकमताची घटना, अत्यंत दुर्मीळच म्हणावी लागेल. एकनाथजींचा व्यापक जनसंपर्क आणि निर्मळ संवादशैली, यामागील प्रमुख कारण होते. कन्याकुमारीतील विवेकानंदपुरम् येथील ‘गंगोत्री’ प्रदर्शनात, हे निवेदन सर्व खासदारांच्या स्वाक्षर्‍यांसह आजही पाहता येते.
 
शास्त्रीजींनी या स्वाक्षर्‍यांची अनेक वेळा बारकाईने पाहणी केली. त्या अस्सल असल्याची खात्री झाल्यानंतर तेही आश्चर्यचकित झाले. त्यांनी एकनाथजींना सांगितले, ‘आता नेहरूजींना राजी करणे हे माझे काम.’ एवढ्या मोठ्या संख्येने खासदारांचे समर्थन पाहून पंतप्रधान नेहरूंनी लोकसभेतच घोषणा केली की, कन्याकुमारीच्या विवेकानंद शिलेवर स्वामीजींचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. या निर्णयामागे लोकशाहीच्या मूलभूत आधारस्तंभांपैकी एक असलेल्या संख्याबळाचा प्रभाव महत्त्वाचा ठरला. ही संपूर्ण घटना एकनाथजींच्या समन्वयकौशल्याची, व्यापक जनसंपर्काची आणि मतभेदांच्या पलीकडे जाऊन सहमती निर्माण करण्याच्या विलक्षण क्षमतेची साक्ष देणारी ठरते.
 
तामिळनाडूमध्ये पूर्वी धर्मादाय मंत्री असताना, शिलेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास तीव्र विरोध करणारे भक्तवत्सलमजी आता मुख्यमंत्री झाले होते. एकनाथजींनी त्यांची अनेक वेळा भेट घेतली. सुरुवातीला स्पष्टपणे नकार देणार्‍या भक्तवत्सलमजींना, एकनाथजींनी सातत्यपूर्ण संवादातून हळूहळू स्मारकाच्या बाजूने वळवले. अखेरीस १५ फूट लांब आणि १५ फूट रुंद मंदिरात, एक छोटी मूर्ती उभारण्यास मुख्यमंत्री तयार झाले. एकनाथजींनी संवादाची दारे खुली ठेवत त्यांना सांगितले, "मंदिराचा आकार, स्थापत्यशैली इत्यादी बाबी तज्ज्ञांच्या कार्यक्षेत्रातील आहेत. आता मी स्मारकासाठी आपली परवानगी मिळाली आहे, असे गृहीत धरून आपल्या नेतृत्वाखालीच हे काम पुढे नेतो. काही संकल्पचित्रे (डिझाईन्स) तयार करून, पुन्हा आपली भेट घेतो. त्यांपैकी आपण जे अंतिम कराल, त्यानुसारच बांधकाम करण्यात येईल.”
 
यानंतर अनेक नामवंत स्थापत्यविशारदांकडून, स्मारकाची विविध रेखाचित्रे तयार करून घेण्यात आली. ‘रामकृष्ण मठा’चे अध्यक्ष महाराज स्वामी माधवानंद आणि सरसंघचालक श्रीगुरुजी यांनी अनुमोदन दिलेल्या संकल्पचित्रावर, भक्तवत्सलमजींचे गुरू कांची परमाचार्य चंद्रशेखरानंद सरस्वतीजी यांची स्वाक्षरी मिळवण्यात आली. त्यानंतर तीन संकल्पचित्रे मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आली. त्यांपैकी एक १२५ चौरस फूट क्षेत्रफळाचे होते आणि प्रत्यक्षात त्यालाच परवानगी मिळवायची होती. ते संकल्पचित्र शेवटी दाखवताना, एकनाथजींनी सहजपणे कांची परमाचार्यांनी दिलेल्या अनुमोदनाचा उल्लेख केला. आपल्या गुरूंच्या स्वाक्षरीने भक्तवत्सलमजी भारावून गेले आणि त्यांनी त्याच नकाशाला अंतिम मंजुरी दिली. तेव्हा एकनाथजींनी हळूच म्हटले; "परंतु, हे तर आपण मागील बैठकीत निश्चित केलेल्या १५ बाय १५ फूट मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे.” त्यावर मुख्यमंत्र्यांना म्हणावे लागले, "काही हरकत नाही, हेच बांधले जाईल.” येथे आध्यात्मिक प्रभावाचा अत्यंत सूक्ष्म आणि सकारात्मक उपयोग करण्यात आला. तो केवळ बाह्य प्रभाव म्हणून नव्हे, तर अंतःकरणातून निर्माण झालेल्या मैत्रीपूर्ण संबंधांच्या माध्यमातूनच सहमती मिळविण्यासाठी करण्यात आला. भक्तवत्सलमजींनी एकनाथजींना वाहिलेल्या श्रद्धांजलीतही, वैचारिक मतभेद असूनदेखील त्यांच्या मैत्रीचा विशेष उल्लेख आढळतो.
 
शिलास्मारकाच्या उभारणीसाठी एक रुपयांच्या कूपनद्वारे, देशभरातील ३५ लाख कुटुंबांकडून ८४ लाख रुपये निधी संकलित करण्यात आला. हा संपूर्ण राष्ट्राच्या भावनिक सहभागाचा अनुपम नमुना होता. देशातील सर्व राज्य सरकारांकडूनही या कार्यासाठी योगदान मिळाले. ज्योती बसू यांच्या पत्नी कमला बसू या ‘विवेकानंद शिलास्मारक निधी संकलन समिती, बंगाल’च्या संरक्षक झाल्या. दुसरीकडे कट्टर साम्यवादी आणि संघाचे प्रखर विरोधक असलेले ई.एम.एस. नंबुदरीपाद त्याकाळी केरळचे मुख्यमंत्री होते. त्यांना स्वामी विवेकानंदांचा ‘दरिद्र देवो भव’ हा संदेश सांगणारी पुस्तके वाचायला देऊन, या कार्यासाठी सहमत करण्यात आले. नागालॅण्ड आणि जम्मू-काश्मीरसह संपूर्ण देशातून मिळालेल्या योगदानातूनच, विवेकानंद शिलास्मारकाची उभारणी झाली. ज्या काळात राजकीय आणि सामाजिक वातावरणातील वैचारिक विरोधाचे रूपांतर अनेकदा शत्रुत्वाच्या सीमेपर्यंत पोहोचलेल्या कटुतेत झाले होते, अशा परिस्थितीत उभे राहिलेले ‘विवेकानंद शिलास्मारक’ हे समन्वयाचे अभूतपूर्व उदाहरण ठरले. या भव्य स्मारकाचे निर्माते होते, ‘समन्वय ऋषी’ एकनाथ रानडे!यामागे लोकशाहीच्या मूलभूत आधारस्तंभांपैकी एक असलेल्या संख्याबळाचा प्रभाव महत्त्वाचा ठरला. ही संपूर्ण घटना एकनाथजींच्या समन्वयकौशल्याची, व्यापक जनसंपर्काची आणि मतभेदांच्या पलीकडे जाऊन सहमती निर्माण करण्याच्या विलक्षण क्षमतेची साक्ष देणारी ठरते.
 
तामिळनाडूमध्ये पूर्वी धर्मादाय मंत्री असताना, शिलेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास तीव्र विरोध करणारे भक्तवत्सलमजी आता मुख्यमंत्री झाले होते. एकनाथजींनी त्यांची अनेक वेळा भेट घेतली. सुरुवातीला स्पष्टपणे नकार देणार्‍या भक्तवत्सलमजींना, एकनाथजींनी सातत्यपूर्ण संवादातून हळूहळू स्मारकाच्या बाजूने वळवले. अखेरीस १५ फूट लांब आणि १५ फूट रुंद मंदिरात, एक छोटी मूर्ती उभारण्यास मुख्यमंत्री तयार झाले. एकनाथजींनी संवादाची दारे खुली ठेवत त्यांना सांगितले, "मंदिराचा आकार, स्थापत्यशैली इत्यादी बाबी तज्ज्ञांच्या कार्यक्षेत्रातील आहेत. आता मी स्मारकासाठी आपली परवानगी मिळाली आहे, असे गृहीत धरून आपल्या नेतृत्वाखालीच हे काम पुढे नेतो. काही संकल्पचित्रे (डिझाईन्स) तयार करून, पुन्हा आपली भेट घेतो. त्यांपैकी आपण जे अंतिम कराल, त्यानुसारच बांधकाम करण्यात येईल.”
 
यानंतर अनेक नामवंत स्थापत्यविशारदांकडून, स्मारकाची विविध रेखाचित्रे तयार करून घेण्यात आली. ‘रामकृष्ण मठा’चे अध्यक्ष महाराज स्वामी माधवानंद आणि सरसंघचालक श्रीगुरुजी यांनी अनुमोदन दिलेल्या संकल्पचित्रावर, भक्तवत्सलमजींचे गुरू कांची परमाचार्य चंद्रशेखरानंद सरस्वतीजी यांची स्वाक्षरी मिळवण्यात आली. त्यानंतर तीन संकल्पचित्रे मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आली. त्यांपैकी एक १२५ चौरस फूट क्षेत्रफळाचे होते आणि प्रत्यक्षात त्यालाच परवानगी मिळवायची होती. ते संकल्पचित्र शेवटी दाखवताना, एकनाथजींनी सहजपणे कांची परमाचार्यांनी दिलेल्या अनुमोदनाचा उल्लेख केला. आपल्या गुरूंच्या स्वाक्षरीने भक्तवत्सलमजी भारावून गेले आणि त्यांनी त्याच नकाशाला अंतिम मंजुरी दिली. तेव्हा एकनाथजींनी हळूच म्हटले; "परंतु, हे तर आपण मागील बैठकीत निश्चित केलेल्या १५ बाय १५ फूट मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे.” त्यावर मुख्यमंत्र्यांना म्हणावे लागले, "काही हरकत नाही, हेच बांधले जाईल.” येथे आध्यात्मिक प्रभावाचा अत्यंत सूक्ष्म आणि सकारात्मक उपयोग करण्यात आला. तो केवळ बाह्य प्रभाव म्हणून नव्हे, तर अंतःकरणातून निर्माण झालेल्या मैत्रीपूर्ण संबंधांच्या माध्यमातूनच सहमती मिळविण्यासाठी करण्यात आला. भक्तवत्सलमजींनी एकनाथजींना वाहिलेल्या श्रद्धांजलीतही, वैचारिक मतभेद असूनदेखील त्यांच्या मैत्रीचा विशेष उल्लेख आढळतो.
 
शिलास्मारकाच्या उभारणीसाठी एक रुपयांच्या कूपनद्वारे, देशभरातील ३५ लाख कुटुंबांकडून ८४ लाख रुपये निधी संकलित करण्यात आला. हा संपूर्ण राष्ट्राच्या भावनिक सहभागाचा अनुपम नमुना होता. देशातील सर्व राज्य सरकारांकडूनही या कार्यासाठी योगदान मिळाले. ज्योती बसू यांच्या पत्नी कमला बसू या ‘विवेकानंद शिलास्मारक निधी संकलन समिती, बंगाल’च्या संरक्षक झाल्या. दुसरीकडे कट्टर साम्यवादी आणि संघाचे प्रखर विरोधक असलेले ई.एम.एस. नंबुदरीपाद त्याकाळी केरळचे मुख्यमंत्री होते. त्यांना स्वामी विवेकानंदांचा ‘दरिद्र देवो भव’ हा संदेश सांगणारी पुस्तके वाचायला देऊन, या कार्यासाठी सहमत करण्यात आले. नागालॅण्ड आणि जम्मू-काश्मीरसह संपूर्ण देशातून मिळालेल्या योगदानातूनच, विवेकानंद शिलास्मारकाची उभारणी झाली. ज्या काळात राजकीय आणि सामाजिक वातावरणातील वैचारिक विरोधाचे रूपांतर अनेकदा शत्रुत्वाच्या सीमेपर्यंत पोहोचलेल्या कटुतेत झाले होते, अशा परिस्थितीत उभे राहिलेले ‘विवेकानंद शिलास्मारक’ हे समन्वयाचे अभूतपूर्व उदाहरण ठरले. या भव्य स्मारकाचे निर्माते होते, ‘समन्वय ऋषी’ एकनाथ रानडे!
 
- मुकुल कानिटकर

संबंधित मजकूर