'नयी नवेली'मध्ये आदिनाथ दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत ! adinath kothare

    22-Aug-2026
 
 
adinath
 
 
 
मुंबई - (adinath kothare )विविधांगी भूमिकांमधून आदिनाथ कोठारे नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. त्याच्या रामायणसारख्या भव्य चित्रपटाची चर्चा सुरू असतानाच आदिनाथच्या हाती अजून एक मोठा चित्रपट लागला आहे. बॉलिवूड दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या नई नवेलीमध्ये तो नव्या भूमिकेत दिसणार आहे. यामी गौतम सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार असून हॉरर-कॉमेडीचा डोस चित्रपटात बघायला मिळणार आहे.
 
नई नवेली या चित्रपटाच्या रिलीज पोस्टरवर यामी गौतम दिसत असून यात आदिनाथ कोणती भूमिका साकारत आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे आणि यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. आपल्या बॉलिवूडमधील कामाची सातत्यपूर्ण वाटचाल कायम ठेवत आदिनाथ आगामी काळात झी मराठीसाठी एका नव्या प्रोजेक्टची निर्मितीही करणार आहे. (adinath kothare )
 
नई नवेली दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच 16 ऑक्टोबर 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर रामायण हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे असून एकूणच आगामी काळात आदिनाथ प्रेक्षकांना आणखी नव्या कथा आणि भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. (adinath kothare )
 




संबंधित मजकूर